ज्या व्यक्तींना पर्यटनाची हौस असते असे पर्यटक परदेशातील विविध पर्यटन स्थळांना देखील मोठ्या प्रमाणावर भेट देतात. परंतु प्रत्येकाची इच्छा पैशांअभावी पूर्ण होऊ शकत नाही.
जर आपण आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर मात्र विदेशातील पर्यटन स्थळे फिकी पडतील अशी अनेक पर्यटन स्थळे भारतामध्ये आहेत व जागतिक पर्यटन स्थळांची अनेक दृष्टिकोनातून बरोबरी ही पर्यटन स्थळे करतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण असेच काही ठिकाणे बघणार आहोत जी हुबेहूब विदेशातील काही पर्यटन स्थळांसारखे दिसतात किंवा त्या सारखा फील व्यक्तीला येतो.
भारतातील ही पर्यटन स्थळे म्हणजे विदेशातील पर्यटन स्थळांची आहे कॉपी
1- श्रीनगर मधील ट्यूलिप गार्डन म्हणजेच ॲम्सटरडम येथील ट्यूलीप फेस्टिवल– ॲमस्टरडम येथील ट्यूलीप फेस्टिवल संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला जायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते. या ऐवजी तुम्ही जर श्रीनगरमध्ये गेलात तर आशिया खंडातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन या ठिकाणच्या जबरवान पर्वतराजाच्या कुशीमध्ये वसलेले आहे.
श्रीनगरच्या प्रसिद्ध असलेल्या दल सरोवराकडे हे गार्डन असून या बागेत साठ जाती आणि विविध रंगांच्या 15 लाखांहून जास्त ट्यूलिप्स पाहायला मिळतात. मार्च महिन्यामध्ये हे ट्यूलिप गार्डन लोकांसाठी खुले होते.
2- कशाला स्वित्झर्लंडला जाता,जा गुलमर्गला– स्वित्झरलँड हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असून या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात व कित्येकांची या ठिकाणी जाण्याची इच्छा असते. परंतु तुम्ही भारतात देखील अशा प्रकारचे ठिकाणे पाहू शकतात. स्वित्झरलँड ऐवजी तुम्ही जर काश्मीरमधील गुलमर्गला गेलात तर या ठिकाणी असलेले बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहून तुम्ही स्वित्झर्लंड विसरून जाल.
विशेष म्हणजे गुलमर्गला मिनी स्वित्झर्लंड म्हणून देखील ओळखले जाते. काश्मीरमध्ये जी काही पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी सर्वाधिक गुलमर्गला भेट देत असतात. हिवाळ्यामध्ये ज्याप्रमाणे स्वित्झरलँड मध्ये हिवाळी खेळ खेळले जातात अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हिवाळी खेळांचा आनंद गुलमर्गला देखील घेऊ शकतात.
3- इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ऐवजी भारतातील नैनीताल आहे उत्तम– उत्तराखंड राज्याच्या कुमाउ भागांमध्ये जगप्रसिद्ध असलेले नैनिताल हिल स्टेशन आहे. एक उत्तम असे हिल स्टेशन असून याला तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणाचे तलाव इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट सारखेच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर इंग्लंडचे तलाव पाहायचे असतील तर त्याऐवजी तुम्ही नैनीतालला जाऊ शकतात.
4- अलास्का ऐवजी भारतातील औली ठरेल उत्तम– औली हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी तुम्ही स्कायकिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही अलास्काच्या पर्वतरांगांमध्ये स्कायकिंग करण्याचे विसरून जाल. तसेच औली हे ठिकाण बजेट फ्रेंडली असून या ठिकाणी असलेले सुंदर उतार स्कीइंग प्रेमींकरिता स्वप्नवत आहे.
5- अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीपेक्षा पहा उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स– अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीमध्ये जगातील सर्वात सुंदर फुले आहेत यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
परंतु त्याऐवजी जर तुम्ही उत्तराखंड राज्यातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहिली तर तुम्हाला अँटीलोप व्हॅलीमध्ये जायची गरजच भासणार नाही. हे एक उंचावर असलेले कुरण असून मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत 100 पेक्षा जास्त प्रकारच्या फुलांनी हे ठिकाण बहरलेले असते.