सीएनजी कारची प्रतीक्षा संपली! नव्या अवतारात टाटाने लॉन्च केली ‘ही’ दमदार सीएनजी कार; मिळेल पावरफुल इंजिन आणि उत्तम मायलेज

टाटा मोटर्सच्या कार्स खूप लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्ग देखील या कंपनीचा आहे.ग्राहकांची पसंती आणि मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने आता नवीकोरी अशी Nexon iCNG देशांतर्गत बाजारपेठेत लॉन्च केली असून सीएनजी कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी आता उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे.

Ajay Patil
Published:
nexon icng car

भारतीय कार बाजारपेठेतील सर्वात प्रसिद्ध कंपनी म्हणजेच टाटा मोटर्स ही होय व या कंपनीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी फीचर्स असलेल्या कार आतापर्यंत उत्पादित करण्यात आलेला आहे. जर आपण टाटा मोटर्स कंपनीचा कार पोर्टफोलिओ पाहिला तर यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार आपल्याला पाहायला मिळतात.

तसेच भारतीयांमध्ये टाटा मोटर्सच्या कार्स खूप लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्ग देखील या कंपनीचा आहे.ग्राहकांची पसंती आणि मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने आता नवीकोरी अशी Nexon iCNG देशांतर्गत बाजारपेठेत लॉन्च केली असून सीएनजी कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी आता उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे.

 काय आहे टाटा नेक्सन सीएनजीमध्ये?

Tata Nexon देशातील पहिली अशी कार आहे जी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि अगदी इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये देखील बाजारपेठेत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही नेक्सन सीएनजी तब्बल आठ वेरियंट मध्ये सादर केलेली आहे.

या एसयूव्हीचा लूक आणि डिझाईन तसाच ठेवण्यात आलेला आहे व कंपनीने यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. ही कार अगदी नवीन फेसलिफ्ट मॉडेल सारखी असून यामध्ये स्प्लिट हेडलॅम्प सेटअप देण्यात आलेला आहे.

 कशी आहे या कारची पावर तसेच मायलेज आणि परफॉर्मन्स?

या सीएनजी कारमध्ये कंपनीने 1.2- लिटर  टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले असून जे सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. कंपनीने या कारमध्ये डुएल सिलेंडर टेक्नॉलॉजीचा वापर केला असून या कारमध्ये दोन लहान सीएनजी सिलेंडरचा वापर करण्यात आलेला आहे.

त्यामुळे या कारचा बूट स्पेस कमी होत नाही. या कारमध्ये 321 लिटरची बूट स्पेस आहे. सीएनजी मोडमध्ये इंजिन 99 बीएचपी पावर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच टाटा मोटर्सचा दावा आहे की ही सीएनजी कार 24 किलोमीटर प्रतिकिलोचे मायलेज देते.

 काय आहेत या कारमधील इतर महत्त्वाची फीचर्स?

या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटर फ्रंट सीट्स, एअर पुरिफायर इत्यादींचा समावेश करण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअर बॅग, सर्व सीटकरिता थ्री पॉईंट सीट बेल्ट, ISOFIX तसेच इमर्जन्सी आणि ब्रेक डाऊन कॉल असिस्टची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच या कारमध्ये फ्री स्टॅंडिंग 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून दुसरी स्क्रीन म्हणून 10.25 इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. तसेच उत्तम असे डॅशबोर्ड असून या डॅशबोर्डला कार्बन फायबर सारख्या फिनिशिंग सह लेदर इन्सर्ट देखील देण्यात आला आहे.

 किती आहे कारची किंमत?

टाटा मोटरच्या नेक्सन सीएनजी एसीयुव्हीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत आठ लाख 99 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe