भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी ही एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेली कंपनी असून आजपर्यंत या कंपनीच्या माध्यमातून उत्कृष्ट फीचर्स आणि मायलेज असलेल्या अनेक कार बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत. ग्राहकांच्या माध्यमातून देखील या कंपनीचे अनेक कार पसंतीस उतरतात व मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या माध्यमातून मारुती सुझुकी कंपनीच्या कार खरेदीला पसंती दिली जाते.
त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून अनेक कार मॉडेल आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने जर आपण बघितले तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच नोव्हेंबर मध्ये मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय असलेली मारुती सुझुकी डिझायर नवीन रूपामध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारचे डिझाईन तसेच इतर महत्वाच्या गोष्टींमध्ये बदल करण्यात आले असून ही कार आता हटके अशी बनवण्यात आलेली आहे.
कसे असेल या नवी मारुती सुझुकी डिझायरचे डिझाईन?
या नवीन मारुती सुझुकी डिझायरचे डिझाईन स्विफ्ट 2024 प्रमाणे असून कंपनीने मात्र सेडानला हॅचबॅक पासून हटके दाखवण्यासाठी गाडीचा जो काही बाहेरचा लुक आहे तो हटके केला आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे कंपनीने या कारच्या डिझाईनवर खूप मेहनत घेतल्याचे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार या नवीन स्विफ्टच्या आणि हनीकॉम्ब ग्रील ऐवजी नवीन ग्रील डिझाईन तयार करण्यात आली असून या कारमध्ये एक बोल्ड स्ट्रीट स्टान्स डोअर देण्यात आलेले असून ज्यामध्ये एक मस्क्युलर बोनट आहे.
या कारमध्ये लाइटिंग डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आलेले असून नवीन अँग्युलर एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी फॉग लॅम्पला री डिझाईन करून फ्रंट बंपर मध्ये सेट करण्यात आलेले आहे
तसेच या कारची साईड प्रोफाईल बघितली तर त्यामध्ये एक क्लिअर शोल्डर लाईन, मेटल फिनिस्ट विंडो सील्स आणि फ्रेश ड्युअल टोन अलॉय व्हिल्ससह वेगळा दिसतो. तसेच मागच्या बाजूच्या डिझाईनला एलईडी टेल लॅम्प आणि त्यावर एक मेटॅलिक पट्टी देखील लावण्यात आलेली आहे.
कसे असेल या नवीन स्विफ्ट डिझायरचे इंटेरियर?
नवीन डिझायरमध्ये सिंगल पॅनल सनरुफ असून स्विफ्ट प्रमाणे या नवीन डिझायर मध्ये नऊ इंचीचे इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल तसेच वायरलेस फोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेचा अनॅलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असण्याची शक्यता आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या नवीन डिझायर मध्ये सहा एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम तसेच रिवर्स पार्किंग कॅमेरा, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन लेन्स असण्याची शक्यता आहे.
कसे असेल इंजिन?
या नवीन मारुती डिझायरमध्ये स्विफ्टपेक्षा 1.2-लिटर तीन सिलेंडर नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता असून हे इंजिन 80 बीएचपी पावर आणि 111.7nm चा टॉर्क जनरेट करेल. इतकेच नाही तर या कारमध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय सुद्धा देण्यात येतील व एक पाच स्पीड मॅन्युअल आणि दुसरा पाच स्पीड एएमटी गिअरबॉक्स असेल.