अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान बदलले असून मेघगर्जना होत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान एक अत्यंत महत्वाची घटना यादरम्यान घडणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ नगरकरांच्या भेट घेऊन जाणार आहे. हे चक्रीवादळ आंध्र ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास करत अरबी समुद्रात जाणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात गेल्याची एकही घटना आजवर नोंदलेली नाही.
एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे, यामुळे या घटनेकडे दुर्मिळतेने पाहिले जात आहे. चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने,
येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. असा असणार चक्रीवादळाचा प्रवास मंगळवारी (ता.13)
बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे (ता. 15) जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईत पोचेल.
दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करील. यामुळे राज्यातील सर्वच भागात येत्या 13 ते 18 ऑक्टोबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved