स्थिर सत्तेसाठी हवाय पक्षांतर बंदीचा कायदा; ग्रामपंचायत करू लागलीये मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षातील दिग्गजांनी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या आपल्या पक्षाला रामराम ठोकत पक्षांतर केले आहे.

पक्षांतराच्या या राजकीय डावपेचामुळे सत्तेची गणित बिघडतात, यामुळे नेत्यांसह अनेक पक्षांना याचा मोठा फटका बसल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसत आहे.

यामुळेच कि काय आता पक्षांतर बंदीचा कायदा लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावातील गटबाजी व पक्ष बदलामुळे ग्रामपंचायत सत्ता नेहमी अस्थीर होते.

ग्रामपंचायती स्थीर करण्यासाठी विधानसभा, लोकसभा व जिल्हा परीषदेप्रमाणे पक्षांतर बंदीचा कायदा ग्रामपंचायतींना सुद्धा लागू करावा, अशी मागणी राज्याच्या सरपंच परीषदेने सरकारकडे केली होती.

या मागणीचा विचार करून सरकारने हा कायदा ग्रामपंचायतीसाठी लागू करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी विधी विभागाकडे सरकारने हा प्रस्ताव तपासणीसाठी पाठविला आहे.

काही दिवसापुर्वी भाजपच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षात किमान सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणता येत नव्हता.

त्यामुळे सरपंचाला गावाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करता येत होते. मात्र हा कायदा बदलून पुन्हा अत्ताच्या सरकारने ग्रामपंचायत सदस्यामधूनच सरपंचाची निवड करण्यात येईल, असा कायदा केला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा सरपंचपद अस्थिर झाल्याची भावाना सरपंच परिषदेने केली आहे. त्यामुळे सरपंच परीषदेने पुन्हा एकदा किमान पक्षातर बंदीचा कायदा ग्रामपंचायत सदस्यानाही लागू करावा, अशी मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment