Profitable Business Idea: 300 ते 400 रुपयांमध्ये आणा ‘ही’ वस्तू आणि विका 1000 रुपयांना! आरामात महिन्याला कमवाल 50 हजार

अनेक प्रकारच्या व्यवसाय कल्पना आपण सांगू शकतो की ज्यांना खूप कमीत कमी भांडवल लागते आणि त्या माध्यमातून मिळणारा नफा मात्र उत्तम असा असतो. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा एका व्यवसायाची माहिती बघणार आहोत की तो तुम्ही अगदी पन्नास हजार रुपयांमध्ये सुरू करून महिन्याला 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

Published on -

Profitable Business Idea:- तुमच्याही मनामध्ये जर एखादा व्यवसाय सुरू करण्याचे प्लानिंग असेल तर याकरिता तुम्हाला भांडवल लागेलच. व्यवसाय सुरू करण्या अगोदर जर भांडवलाचा विचार आला तर कित्येक जणांना वाटते की अगदी लाखो रुपये गुंतवणुकीसाठी स्वतःकडे असले तरच आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो.

परंतु तसे पाहायला गेले तर यामध्ये काही तथ्य नाही. तुम्ही अगदी 30 ते 50 हजार रुपये टाकून देखील एक चांगला व्यवसाय सुरू करून महिन्याला तीस ते पन्नास हजारापर्यंत आरामात कमाई करू शकतात.

अशा अनेक प्रकारच्या व्यवसाय कल्पना आपण सांगू शकतो की ज्यांना खूप कमीत कमी भांडवल लागते आणि त्या माध्यमातून मिळणारा नफा मात्र उत्तम असा असतो. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा एका व्यवसायाची माहिती बघणार आहोत की तो तुम्ही अगदी पन्नास हजार रुपयांमध्ये सुरू करून महिन्याला 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

 दुकानाशिवाय सुरू करा कपड्यांचा व्यवसाय

तुम्हाला जर कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी कमीत कमी भांडवलामध्ये तो सुरू करू शकतात. आपल्याला माहित आहे की गुजरात राज्यातील सुरत आणि अहमदाबाद हे कपड्यांसाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्हाला अगदी 200 ते 300 रुपयांना देखील चांगले  तयार कपडे मिळू शकतात आणि हेच कपडे तुम्ही अगदी आठशे ते हजार रुपयांमध्ये एक ड्रेस अशा पद्धतीने देखील विकू शकतात.

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकतात. सुरत आणि अहमदाबाद व्यतिरिक्त तुम्ही दिल्ली सारख्या ठिकाणहून देखील रेडिमेड कपड्यांची होलसेल मध्ये खरेदी करून त्यांची विक्री करू शकतात व या व्यवसायामध्ये मुली आणि महिलांसाठी डिझायनर सूट, तसेच नवीन ट्रेंडी कपडे तसेच टी-शर्ट इत्यादी स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळू शकतात.

 अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय

तुम्ही सुरत तसेच अहमदाबाद किंवा दिल्ली सारख्या शहरात जाऊन महिला आणि पुरुषांसाठी लागणारे घाऊक कपडे स्वस्त दरामध्ये खरेदी करू शकता व तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारपेठेच्या गजबजलेल्या ठिकाणी दुकाना ऐवजी अगदी छोट्या चार चाकी गाडीच्या मदतीने देखील रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात.

अशाप्रकारे कपडे विक्रीच्या व्यवसायाचे गणित पाहिले तर रस्त्याच्या कडेला असलेला कपड्याचा दुकानदार व्यवसायिक कपड्यांच्या दुकानापेक्षा जास्त कमाई करतो. तुम्ही अगदी कमीत कमी भांडवलामध्ये फुटपाथवर हा व्यवसाय सुरू करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

 किती येईल यासाठी खर्च?

रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय असून कमीत कमी पन्नास हजार रुपयांचा खर्च करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. पन्नास हजार रुपयांमध्ये तुम्ही महिला आणि पुरुषांसाठी आवश्यक कपडे खरेदी करू शकाल आणि बाजारात त्यांची विक्री करू शकतात.

या व्यवसायाची सुरुवात अगदी कमी खर्चात करून तुम्हाला नफा मिळू लागल्यावर तुम्ही या व्यवसायात वाढ करून गुंतवणूक वाढवू शकतात व जास्तीचा नफा मिळवू शकतात.

 किती मिळू शकतो यात नफा?

जर तुम्ही एखाद्या बाजारपेठेच्या गजबजलेल्या परिसरामध्ये जर हा रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केला व तुमच्याकडे जर ग्राहक वाढले तर महिन्याला तुम्ही लाखो रुपये सहज या माध्यमातून कमवू शकतात.

या व्यवसायामध्ये तुम्ही सुरत, अहमदाबाद किंवा दिल्ली सारख्या ठिकाणाहून जर साडी आणली तर तुम्हाला 300 ते 400 रुपयांना एक साडी मिळू शकते व तुम्ही या ठिकाणी 600 ते 700 तसेच हजार रुपयापर्यंत देखील विकू शकतात. कपड्यांच्या व्यवसायामध्ये मार्जिन खूप जास्त असल्याने  कमीत कमी खर्चात तुम्हाला उत्तम पद्धतीने पैसा या माध्यमातून कमावता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe