Numerology:- आपल्याला माहित आहे की अंकशास्त्रानुसार व्यक्तीची जी जन्मतारीख असते त्यावरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो व या मुलांकावरून व्यक्तीचे वैवाहिक जीवन तसेच त्याची आर्थिक परिस्थिती कशी राहील किंवा त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दलची माहिती आपल्याला मिळत असते.
आपल्याला माहित आहे की जन्मतारखेनुसार किंवा जन्मतारखेवरून प्रत्येक राशीचा मुलांक हा काढला जात असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्याचा जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 14 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 1+4=5 असतो. अशाप्रकारे प्रत्येक राशीचा मुलांक वेगवेगळ्या असतो व प्रत्येक मुलाकांचा स्वामीग्रह देखील वेगळा असतो.
याप्रमाणे जर आपण अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या चार, 13 आणि 22 किंवा 31 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असतो अशा व्यक्तींचा मुलांक हा चार असतो.त्यामुळे या चारही तारखांपैकी कोणत्याही तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या मुलांकावरनं कसा असतो? आयुष्यामध्ये त्याला करिअर किंवा इतर गोष्टीत यश कसे मिळते? इत्यादी बद्दलची माहिती या लेखात बघू.
कोणत्याही महिन्याच्या चार,तेरा, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते?
1- स्वभावाने रहस्यमयी असतात– ज्या लोकांचा मुलांक चार असतो ते उत्तम योजना आखण्यामध्ये तरबेज असतात. काही गोष्टींमध्ये ते व्यावहारिक दृष्टिकोनानेच विचार करतात व स्वभावाने ते रहस्यमयी असतात. कुठल्याही गोष्टीवर ते सहजपणे व्यक्त होत नाही व जास्त प्रमाणात बोलत देखील नाहीत.
2- अत्यंत हट्टी आणि मनाचे मालक असतात– चार मुलांक असलेले व्यक्ती हे स्वभावाने खूप हट्टी आणि मनाचे मालक असतात. या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या मनाप्रमाणेच वागायला आणि जगायला देखील आवडते. त्यांना कोणी जरी सल्ला दिला तरी ते त्याचा सल्ला स्वीकारत नाही किंवा ऐकत नाहीत.
यामुळेच ते एखाद्या वेळेस चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातात किंवा चुकीच्या सवयी स्वतःला लावून आयुष्य उध्वस्त देखील करू शकतात. स्वतःमध्ये ते बदल कधीच करत नाहीत. एखाद्या नवीन ठिकाणी किंवा नवीन वातावरणामध्ये गेले तर त्या ठिकाणी देखील त्यांना जुळवून घेता येत नाही.
3- हे लोक दुसऱ्यांना दुःखी पाहू शकत नाही– मूल्यांक चार असलेले व्यक्तींचा एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक दुसऱ्याला कधीच दुःखी बघू शकत नाही व जन्मत अतिशय मेहनत व प्रामाणिक असतात.
दुसऱ्यांशी मैत्री करणे आणि लोकांमध्ये मिसळणे मात्र यांना आवडत नाही. मुख्यत्वे त्यांना एकटेपणाने राहायला खूप आवडते. परंतु ज्या व्यक्तींची किंवा ज्यांच्याशी त्यांचे नाते जवळचे असते त्यांच्याशी मात्र ते अतिशय प्रामाणिकपणे नाते जपण्याचा प्रयत्न करतात.
4- जिद्दीने ध्येय साध्य करतात– या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती जरी चढउतार आले तरी ते मेहनतीने व जिद्दीने आपले ठरवलेले ध्येय साध्य करतात. स्वभावाने ते अतिशय साधे असतात. परंतु त्यांच्यात असलेले कौशल्य व प्रामाणिकपणामुळे बाकीचे लोक त्यांना पसंत करतात.
5- वयाच्या 42 व्या वर्षानंतर मिळते यश– चार मुलांक असलेल्या व्यक्तीचा स्वामी ग्रह राहू असल्याने या व्यक्तींना सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट भोगावे लागतात. परंतु त्यानंतर मात्र चांगले यश त्यांना मिळते.
या लोकांवर राहूचा प्रभाव दिसून येत असल्याने त्यांना 42 व्या वर्षानंतर भरपूर यश मिळते. राहू मुळे या व्यक्तींच्या जीवनात अचानकपणे मोठा बदल घडतो व अचानक धनलाभ आणि यश मिळते.