‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार इतका बोनस

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 12 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा दसऱ्याचा सण आनंदात पार पडणार आहे. यासाठी सरकारकडून 2029 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः माहिती दिली आहे.

Published on -

Government Employee News : कालपासून देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू झाला आहे. हिंदू सनातन धर्मात नवरात्र उत्सवाला मोठा मान आहे. नवरात्रोत्सव हा पवित्र सण कालपासून सुरू झाला असून घटस्थापनेपासून ते विजयादशमी पर्यंत हा पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान या आनंदाच्या पर्वात देशातील लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे.

सरकारने काल अर्थातच घटस्थापनेच्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 12 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा दसऱ्याचा सण आनंदात पार पडणार आहे. यासाठी सरकारकडून 2029 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार केंद्र कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यासाठी 2029 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

त्यामुळे देशातील 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. नक्कीच शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार

केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ करणे प्रस्तावित आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू केली जाणार आहे.

मात्र याचा निर्णय हा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाईल. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांनी कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक संपन्न होईल. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर सही केली जाणार आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबत दिला जाणार आहे. अर्थातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सदर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News