Health Tips: पपईच्या पानांचे एक कप पाणी आठवड्यातून तीनदा प्या आणि मिळवा आरोग्यदायी फायदे! वाचा कसे आहे आरोग्यासाठी वरदान?

पपई मधून अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर मिळते व आरोग्यासाठी ते खूप फायद्याचे आहे. परंतु पपई आरोग्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच पपईच्या झाडाच्या पानांचे पाणी सुद्धा पोषक घटकांनी समृद्ध असून आरोग्याच्या विविध समस्या टाळण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे.

Ajay Patil
Published:
papaya water leaves

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्या करिता संतुलित आहार घेणे गरजेचे आहे व या संतुलित आहारामध्ये प्रामुख्याने हिरव्या भाजीपाला तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मटन किंवा चिकन तसेच अंडी, मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांचा देखील समावेश आहारात असणे तितकेच गरजेचे आहे.

यामध्ये बरेचजण फळांचा समावेश करत असतात व फळांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पपई प्रत्येकाचे आवडते असे फळ असून अगदी लहानांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत आवडीने पपई खाल्ली जाते.

पपई मधून अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर मिळते व आरोग्यासाठी ते खूप फायद्याचे आहे. परंतु पपई आरोग्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच पपईच्या झाडाच्या पानांचे पाणी सुद्धा पोषक घटकांनी समृद्ध असून आरोग्याच्या विविध समस्या टाळण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे या लेखात आपण पपईच्या पानांचे पाणी  प्यायलास आरोग्यास कोणते फायदे मिळतात? याबद्दलची माहिती बघू.

 पपईच्या पानांचे पाणी आरोग्यासाठी कसे आहे फायदेशीर?

1- प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी फायदेशीर बऱ्याचदा शरीरातील प्लेटलेटची संख्या लक्षनीयरीत्या कमी होते व ही समस्या प्रामुख्याने डेंगू सारख्या आजारामध्ये दिसून येते. बाजारामध्ये प्लेटलेटची संख्या खूप वेगात कमी होते. परंतु यामध्ये जर पपईच्या पानांच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केले तर डेंगूचा रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

2- अँटिऑक्सिडंटचा असतो समृद्ध स्त्रोत पपईच्या पानांमध्ये विटामिन ई, विटामिन सी तसेच फ्लेवोनॉइडस अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात व ते शरीराला ऑक्सिडेटीव्ह तणावापासून दूर ठेवतात.

पपईच्या पानांचे पाणी नियमितपणे प्यायल्यामुळे पेशी खराब होत नाही तसेच  त्यामधील अँटीऑक्सिडंट हृदयरोग तसेच मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग इत्यादी आजारांचा धोका कमी करू शकतात.

3- पचनसंस्थेच्या आरोग्य करिता जर हे पाणी प्यायले तर बद्धकोष्ठतेसारखे पचनक्रियेशी असलेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. तसेच जळजळ कमी होते आणि आतड्यातील निरोगी जिवाणू वाढतात.

4- सांधेदुखी स्नायू दुखी पासून आराम मिळतो पपईच्या पानांच्या पाण्यामध्ये अल्कालॉइड्स आणि फ्लेवोनॉईड्स यासारखे संयुगे असतात व ते शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात. तसेच स्नायू दुखी व सांधेदुखी सारख्या त्रासापासून देखील रुग्णाला आराम मिळू शकतो.

5- लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यासाठी पपईच्या पानांचे पाणी खूप फायदेशीर आहे. तसेच पोषक घटकांचे चयापचय करण्यास आणि विविध शारीरिक कार्याचे नियमन करण्यात यकृत महत्वाची भूमिका बजावते. पपईच्या पानांमध्ये ऍसिटोजेनिन्स असते व ते यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते व यामुळे यकृताची कार्यक्षमता वाढते.

6- मधुमेहामध्ये फायदेशीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यासाठी खूप मोठी मदत होते. झालेल्या अभ्यासातून असे देखील दिसून आले आहे की, पपईच्या पानांचे पाणी एकूण ग्लुकोजची चयापचय क्रिया सुधारायला देखील मदत करते व त्यामुळे त्याचा फायदा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो.

7- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हे पाणी शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करते. पपईच्या पानांच्या पाण्यामध्ये जीवनसत्व ए, जीवनसत्व सी व जीवनसत्व ई भरपूर प्रमाणात असतात. पपईच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आजारांपासून बचाव होतो.

( टीप पपईच्या पानांच्या पाण्याचे सेवन हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असल्यामुळे हे पाणी पिण्यापूर्वी किंवा सेवन करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये घेत आहात की नाही याची देखील खात्री करणे आवश्यक आहे.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe