LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी आहे लयभारी! 20 वर्षाच्या पॉलिसीसाठी फक्त 12 वर्षे भरा प्रीमियम आणि मिळवा फायदेच फायदे; वाचा माहिती

एलआयसीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पॉलिसी राबवल्या जातात व त्यातीलच आपण एलआयसीची जीवन आझाद पॉलिसी बघितली तर ही खूप फायदेशीर अशी पॉलिसी असून यात पॉलिसी धारकाला जीवन विमा संरक्षण मिळते व निश्चित रक्कम देखील मिळते.

Ajay Patil
Published:
lic policy

LIC Policy:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण उपलब्ध पर्याय पाहिले तर यामध्ये गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परताव्याच्या दृष्टिकोनातून बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना लोकप्रिय असून या माध्यमातून गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परतावा याची हमी असते.

यासोबतच गुंतवणूकदारांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी होय. एलआयसीच्या देखील अनेक प्रकारच्या पॉलिसी असून या माध्यमातून जीवन विमा संरक्षण मिळतेस

परंतु बचतीसाठी देखील अनेक पॉलिसी या उत्तम पर्याय आहेत. एलआयसीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पॉलिसी राबवल्या जातात व त्यातीलच आपण एलआयसीची जीवन आझाद पॉलिसी बघितली तर ही खूप फायदेशीर अशी पॉलिसी असून यात पॉलिसी धारकाला जीवन विमा संरक्षण मिळते व निश्चित रक्कम देखील मिळते.

 कसे आहे एलआयसीच्या जीवन आझाद पॉलिसीचे स्वरूप?

ही एक नॉन लींक्ड आणि नॉन पार्टिसिपेड वैयक्तिक बचत जीवन विमा योजना असून या योजनेअंतर्गत पॉलिसी धारकाला या पॉलिसीची मुदत संपण्याच्या कालावधीपर्यंत जीवन विमा संरक्षण तर मिळतेच आणि मुदत संपल्यानंतर निश्चित रक्कम देखील मिळते.

या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीधारकाला संपूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरण्याची गरज नसते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही वीस वर्षांसाठी जर पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला फक्त बारा वर्षांसाठी त्याकरिता आवश्यक असलेला प्रीमियम भरावा लागतो.

अठरा वर्षाच्या कालावधी करिता पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला दहा वर्षांकरिता प्रीमियम भरावा लागतो. तसेच पॉलिसी धारकासाठी मासिक, त्रीमासिक तसेच सहामाही किंवा वार्षिक पर्यायांमध्ये प्रीमियम भरता येऊ शकतो.

यामुळे पॉलिसी धारकाला पॉलिसी भरणे अधिक सोयीस्कर होते. या पॉलिसी अंतर्गत किमान विमा रक्कम दोन लाख रुपये आणि कमाल विमा रक्कम पाच लाख रुपये आहे. पॉलिसीच्या मुदत संपण्यापर्यंत टिकून राहणाऱ्या पॉलिसीधारकांना संपूर्ण रक्कम दिली जाते.

उदाहरण घ्यायचे झाले तर तीस वर्षाच्या व्यक्तीने दोन लाख रुपयांच्या विमा रकमेसह ही पॉलिसी 18 वर्षांसाठी घेतली तर त्याला दहा वर्षांसाठी बारा हजार अडतीस रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशा पद्धतीने एलआयसीची जीवन आझाद पॉलिसी आर्थिक भविष्यासाठी खूप सुरक्षित पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe