अहमदनगर जिल्ह्यातील 8 जागांवर शरद पवार पक्षाचा दावा! या 4 जागांवर उमेदवार निश्चित; वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहेत इच्छुक?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास आठ जागांवर दावा केला असून यामध्ये भाजपचे विवेक कोल्हे,माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि मधुकर पिचड हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

Published on -

Ahmednagar News: सध्या विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजू लागला असून प्रत्येक पक्षाकडून या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. तसेच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये सरळ लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

परंतु या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये कोणाला तिकीट द्यावे याकरिता तारेवरची कसरत प्रत्येक पक्षाला करावी लागणार आहे. तसेच अजून देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप झालेले नसल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून जागांसाठी दावे केले जात आहेत.

याच पद्धतीने जर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास आठ जागांवर दावा केला असून यामध्ये भाजपचे विवेक कोल्हे,माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि मधुकर पिचड हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

 राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अहमदनगर जिल्ह्यातील आठ जागांवर दावा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जिल्ह्यातील आठ जागांवर दावा केला असून यामध्ये भाजपचे विवेक कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच मधुकर पिचड हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

विशेष म्हणजे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या सात ऑक्टोबर रोजी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहेत. जवळपास अकोले, कोपरगाव, शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, कर्जत जामखेड,नेवासा, शिर्डी अशा जवळपास दहा विधानसभा मतदारसंघातून 22 इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

यामध्ये मात्र राहुरी व कर्जत जामखेड मधून प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये जर कोपरगावचा विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार अशुतोष काळे सध्या अजित पवार गटात असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार दिला जाईल हे निश्चित मानले जात आहे.

कोपरगावच्या राजकारणात काळे आणि कोल्हे हे पारंपारिक विरोधक असून त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विवेक कोल्हे असतील असे देखील जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी म्हटले आहे.अकोले विधानसभा मतदार संघाकरिता अमित भांगरे व मधुकर तळपाडे यांचे अर्ज आले आहेत व याच मतदारसंघातून पिचड पिता पुत्र देखील पक्षाच्या संपर्कात आहेत.

माजी आमदार चंद्रशेखर घुले देखील शरद पवार यांच्या संपर्कात असून त्यांच्याबाबत मात्र अजून पक्षाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे देखील फाळके यांनी सांगितले. नगर शहरातून तीन अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. नगर शहरातून माजी महापौर संदीप कोतकर पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

 वाचा कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोण आहेत इच्छुक?

1- अकोले अकोले मतदारसंघातून अमित भांगरे व मधुकर तळपाडे हे इच्छुक आहेत.

2- कोपरगाव दिलीप लासुरे आणि संदीप वर्पे हे इच्छुक आहेत.

3- शिर्डी रणजीत नानासाहेब बोटे आणि एडवोकेट नारायणराव ज्ञानेश्वर कार्ले हे इच्छुक आहेत.

4- नेवासा नेवासा मतदारसंघातून डॉक्टर वैभव सुखदेव शेटे हे इच्छुक आहेत.

5- शेवगावपाथर्डी या ठिकाणाहून प्रताप ढाकणे तसेच विद्या भाऊसाहेब गाडेकर इच्छुक आहेत.

6- राहुरी राहुरीमधून आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत.

7- पारनेर पारनेर मधून खा.निलेश लंके यांच्या पत्नी राणी निलेश लंके, रोहिदास कर्डिले आणि माधवराव लामखेडे हे इच्छुक आहेत.

8- अहमदनगर शहर अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी आणि डॉ. अनिल आठरे हे इच्छुक आहेत.

9- श्रीगोंदा श्रीगोंदा मधून बाळासाहेब भोस, राहुल जगताप आणि निवास श्रीधर नाईक, अण्णासाहेब शेलार हे इच्छुक आहेत.

10- कर्जतजामखेड रोहित पवार हे इच्छुक आहेत.

 हे चार उमेदवार आहेत निश्चित

1- कोपरगाव मधून विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीचे प्रमुख उमेदवार असतील असे फाळके यांनी जाहीर केले आहे.

2- शेवगावपाथर्डी मधून प्रताप ढाकणे हे उमेदवार प्रमुख असतील.

3- राहुरी मधून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार निश्चित आहेत.

4- कर्जतजामखेड मधून रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!