Bank FD Interest Rate: कराल ‘या’ बँकांमध्ये एफडी तर मिळेल जास्त परतावा! एफडीवर जास्त व्याज मिळवायचे असेल तर वाचा बँकांची यादी

एफडी म्हणजेच मुदत ठेव योजना बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते. यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे कालावधीनुसार देण्यात येणारा व्याजदर हा वेगवेगळा असल्यामुळे ज्या कुणाला मुदत ठेव म्हणजे एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना विविध बँकांचे व्याजदर माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.

Published on -

Bank FD Interest Rate:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा एक गुंतवणुकीचा सर्वात विश्वासार्ह आणि गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचा असा पर्याय आहे. गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून अनेक गुंतवणूकदार मुदत ठेवींना म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजनांना महत्त्व देतात.

अशा प्रकारच्या एफडी म्हणजेच मुदत ठेव योजना बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते. यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे कालावधीनुसार देण्यात येणारा व्याजदर हा वेगवेगळा असल्यामुळे ज्या कुणाला मुदत ठेव म्हणजे एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना विविध बँकांचे व्याजदर माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.

तुम्हाला देखील जास्त व्याजदर असणारी एफडी योजना हवी असेल तर आपण या लेखामध्ये काही बँकांची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही मुदत ठेवीत गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त परतावा मिळणार आहे.

 या बँकांमध्ये कराल एफडी तर मिळेल जास्त परतावा

1- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक ही सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.50% ते 7.25 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.

त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी 4% ते 7.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.30% ते 8.05% दरम्यान व्याजदर बँकेच्या माध्यमातून दिला जात आहे. इतकेच नाही तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये चारशे दिवसांच्या मुदतीची एफडी केली तर त्यावर 7.25% ते 7.75 टक्के आणि 8.5% पर्यंत व्याजदर देत आहे.

2- पंजाब आणि सिंध बँक पंजाब आणि सिंध बँकेमध्ये जर एफडी केली तर या बँकेच्या माध्यमातून देखील चांगला व्याजदर दिला जात आहे. पंजाब आणि सिंध बँक सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीच्या एफडी करिता 2.80% ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे.

इतकेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना तीन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 0.50% अतिरिक्त व्याज मिळत आहे. तसेच या बँकेच्या माध्यमातून सुपर सीनियर सिटीजन स्पेशल एफडी जी 222 दिवस, 333 दिवस, 444 दिवस,666 आणि 999 दिवसांच्या एफडीवर 0.15% अतिरिक्त व्याजाचा लाभ देत आहे.

3- बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. या बँकेत सामान्य नागरिकांनी जर सात दिवसापासून ते दहा वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर त्यांना 4.25% ते 7.15% दरम्यान व्याजदर मिळत आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांना 4.75% ते 7.60% पर्यंत व्याज देत आहे. तसेच अति ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदराचा लाभ या बँकेच्या माध्यमातून दिला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!