चला सोबत येऊ आणि शरद पवारांना साथ देऊ! हर्षवर्धन पाटलांची राजेंद्र नागवडे यांना गळ; श्रीगोंदयाचे राजकारण तापणार?

हर्षवर्धन पाटील आणि नागवडे घराणे यांच्या संबंध मैत्रीपूर्ण असून शरद पवार आणि स्वतःची बाजू भक्कम व्हावी याकरिता त्यांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभेतील राजकारण वेगळे वळण घेईल किंवा तापदायक होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Ajay Patil
Published:
harshwardhan patil

Ahmednagar News: विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत असून यासाठीच्या आवश्यक मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नेमके कुणाला निवडणुकीचे तिकीट द्यावे हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर बऱ्याच मतदारसंघांमधून दिसून येत आहे.

त्यातल्या त्यात अजून देखील महाविकास आघाडी असो किंवा महायुती  यांच्यामधील घटक पक्षात जागावाटप निश्चित झाले नसल्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाला दिला जाईल याबाबत अजूनही निश्चित नाही व त्यामुळे सगळे संभ्रमात टाकणारे वातावरण आहे.

त्यातल्या त्यात जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी आमदार बबनराव पाचपुते तसेच माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार तसेच साजन पाचपुते, सुवर्णा पाचपुते, अण्णासाहेब शेलार इत्यादी मंडळी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी अजून देखील महायुतीकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही व महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. परंतु आता त्यातल्या त्यात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला  सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे ठरवले व आता शरद पवार यांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हर्षवर्धन पाटील आणि नागवडे घराणे यांच्या संबंध मैत्रीपूर्ण असून शरद पवार आणि स्वतःची बाजू भक्कम व्हावी याकरिता त्यांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभेतील राजकारण वेगळे वळण घेईल किंवा तापदायक होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात येण्यासाठी हर्षवर्धन पाटलांची नागवडे यांना गळ

माजी सहकार मंत्री आणि नागवडे घराण्याशी स्नेह असणारे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपली बाजू भक्कम करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी गळ घातल्याची माहिती समजते.

त्यामुळे श्रीगोंद्याच्या तापलेल्या राजकीय आखाड्यात वादळापूर्वीची शांतता निर्माण होऊ लागली आहे.श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार, साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, टिळक भोस, सुवर्णा पाचपुते, निवास नाईक आदी इच्छुक आहेत.

श्रीगोंद्याची जागा भाजपने सोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांना नकार दिल्याचे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राहुल जगताप उमेदवारी मागत आहेत. यंदा अनुराधा नागवडे यांनी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.

मात्र उमेदवारीचा प्रश्न समोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा का दिला? यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. श्रीगोंदा येथे रयत शिक्षण संस्थेने शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमास राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा यांनी लावलेली हजेरी भुवया उंचावणारी ठरली.

नागवडे यांच्या भूमिकेकडे लक्ष..

हर्षवर्धन पाटील यांनी आपले आसन मजबूत करण्यासाठी श्रीगोंद्याचे राजेंद नागवडे व अन्य काही सहकाऱ्यांना पक्षांतर करण्यासाठी गळ घातल्याचे समजते. सध्या तरी नागवडे यांनी याबाबत नकार दिल्याचे समजते. मात्र, नागवडे दोन दिवसात अजित पवार यांना उमेदवारीबाबत बोलणार असल्याचीही माहिती समजते. अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास नागवडे काय भूमिका घेतात, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe