Property Transfer Method: जिवंतपणी प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या 2 पद्धती! काय आहे दोन्ही मधील फरक? वाचा माहिती

हयातपणातच संपत्तीचे वाटप किंवा हस्तांतरण पुढच्या पिढीला करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलतात. अशा पद्धतीने संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याच्या साधारणपणे दोन पद्धती आहेत व यामध्ये मृत्युपत्र आणि गिफ्ट डिड या पद्धतींचा समावेश होतो.

Published on -

Property Transfer Method:- प्रॉपर्टी एक महत्त्वाचा मुद्दा असून व्यक्तीच्या जीवनामध्ये संपत्तीचे खूप महत्त्व असते.त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला संपत्ती वाटपावरून वाद होताना दिसतात अशा प्रकारचे वाद कधीकधी कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात.

त्यामुळे बरेच व्यक्ती त्यांच्या हयातपणातच संपत्तीचे वाटप किंवा हस्तांतरण पुढच्या पिढीला करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलतात. अशा पद्धतीने संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याच्या साधारणपणे दोन पद्धती आहेत व यामध्ये मृत्युपत्र आणि गिफ्ट डिड या पद्धतींचा समावेश होतो.

या दोन्ही पद्धती अतिशय कायदेशीर असून संपत्ती हस्तांतरण करण्याचे महत्त्वाचे साधने आहेत. परंतु या दोन्हीमध्ये फरक असून तो समजून घेणे खूप गरजेचे आहे.

 प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठीच्या या आहेत दोन पद्धती

1- प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठीची गिफ्ट डीड पद्धत ही जर पद्धत पाहिली तर ही एक स्थायी प्रक्रिया असते व एकदा संपत्ती हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित प्रॉपर्टी वरील मालकाचा अधिकार हा पूर्णपणे संपतो.

त्यामुळे तुम्हाला जर गिफ्ट डिड या पद्धतीने संपत्ती ट्रान्सफर करायची असेल तर पूर्ण विश्वास असलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने संपत्ती ट्रान्सफर करणे फायद्याचे ठरते. या पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला संपत्ती ट्रान्सफर केली तर एक मोठा भाग दिला जात असतो व इतर वारसांमध्ये याबद्दल वाद देखील उत्पन्न होऊ शकतो.

 गिफ्ट डिड तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

यामध्ये प्रामुख्याने अगोदर डिड तयार केली जाते व यामध्ये प्रॉपर्टी देणारा व ज्याला प्रॉपर्टी मिळते व संपत्तीचे वितरण कशा पद्धतीने होत आहे इत्यादी गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात.

यामध्ये दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यक असते. यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात व ते प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये रक्तातील नात्यात प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी स्टॅम्प ड्युटी दोनशे रुपये आणि एक टक्का मेट्रोपॉलिटन सेस लागतो.

या पद्धतीने जर निकटवर्ती यांना संपत्ती ट्रान्सफर केली तर ती करमुक्त देखील असते. परंतु नात्याबाहेरील व्यक्तीला जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असाल तर यावर पन्नास हजारापेक्षा अधिक संपत्तीवर कर द्यावा लागतो.

तसेच प्राप्तकर्त्यास संपत्ती विकल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो व तो संपत्तीच्या मूळ खरेदीच्या किमतीवर ठरतो.

2- प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठीची मृत्युपत्र पद्धत मृत्युपत्र हे कायदेशीर दस्तऐवज असून या माध्यमातून मृत्यूनंतर संपत्ती नेमकी कुणाला आणि कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची किंवा द्यायची हे निश्चित केले जाते.

या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सदर संपत्ती आयुष्यभर तुमच्या नावावर राहते व त्यावर तुमचा हक्क राहतो व त्यावर तुम्ही कधीही  बदल करू शकतात.

 कशी आहे मृत्युपत्र तयार करण्याची प्रक्रिया?

मृत्युपत्र तयार करताना त्यामध्ये स्पष्ट केले जाते की तुमचे संपत्ती कुणाकुणात आणि कशा पद्धतीने वाटली जाईल. जेव्हा मृत्युपत्र तयार केले जाते तेव्हा त्यावर दोन साक्षीदारांची सही गरजेचे असते.

याची नोंदणी अनिवार्य नाही मात्र त्यामुळे कायदेशीर सुरक्षा मिळते. जर मृत्युपत्राच्या बाबतीत जर आपण टॅक्स नियम पाहिला तर भारतात मृत्युपत्राच्या माध्यमातून संपत्ती हस्तांतरणावर उत्तराधिकारी टॅक्स लागत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News