CNG SUV Car: दसरा आणि दिवाळीत तुम्हाला परवडणारी सीएनजी SUV कार खरेदी करायची आहे का? या आहेत बेस्ट सीएनजी कार! देतात 27 किमी मायलेज

भारतीय कार बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून बघितले तर विविध कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक एसयुव्ही कार मार्केटमध्ये असून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही खरेदी करण्याची मागणी देखील सातत्याने वाढताना दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
cng car

CNG SUV Car:- भारतीय कार बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून बघितले तर विविध कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक एसयुव्ही कार मार्केटमध्ये असून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही खरेदी करण्याची मागणी देखील सातत्याने वाढताना दिसून येत आहे.

यामध्ये अनेक आघाडीच्या उत्पादक कंपन्यांनी बाजारामध्ये सीएनजी एसयूव्ही लॉन्च केल्या असून येणाऱ्या कालावधीत तुम्हाला जर परवडणाऱ्या किमतीतली सीएनजी वर चालणारी एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. सध्या भारतीय कार बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या तीन परवडणाऱ्या सीएनजी एसयूव्ही कारची माहिती आपण लेखात घेऊ.

 या आहेत भारतीय कार बाजारपेठेतील परवडणाऱ्या दरातील सीएनजी एसयूव्ही

1- टाटा नेक्सन आयसीएनजी(Tata Nexon iCNG)- भारतातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडेच नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट बाजारात आणले आहे. जे त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीपैकी एक आहे.

जर आपण या कारचा पावरट्रेन बघितले तर या कारमध्ये  1.2- लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन असून जे 99 बीएचपीची कमाल पावर आणि 170 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यासाठी या कारची भारतीय बाजारपेठेत एक्स शोरूम किंमत 14 लाख 50 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे टाटा नेक्सन सीएनजी 24 किलो मीटर प्रतिकिलो मायलेज देते.

2- टाटा पंच सीएनजी तुम्हाला जर स्वस्त दरामध्ये नवीन सीएनजी एसयूव्ही खरेदी करायचा असेल तर टाटा पंच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. टाटा पंच सीएनजीमध्ये 1.2- लिटर तीन सिलेंडर इंजिन दिले असून जे ७२ बीएचपीची कमाल पावर आणि 103 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असून या कारचे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

टाटा पंच आपल्या ग्राहकांना 26.99 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते. टाटा पंचची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सात लाख 23 हजार रुपये असून टॉप मॉडेलची किंमत नऊ लाख 45 हजार पर्यंत जाते.

3- मारुती सुझुकी ब्रेझा एससीएनजी मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे ब्रिजा ही होय. मारुती सुझुकी ब्रेझ्झाच्या सीएनजी प्रकारात पावर ट्रेन म्हणून 1.5- लिटर चार सिलेंडर इंजिन आहे. जे 87 बीएचपीची कमाल पावर आणि 121 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

या कारचे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. मारुती सुझुकी ब्रेझ्झा सीएनजी 25.51 किमी प्रतिकिलो मायलेज देते. मारुती सुझुकी ब्रेझ्झा सीएनजीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत टॉप मॉडेलमध्ये नऊ लाख 29 हजार रुपये ते 12 लाख 9 हजार रुपये दरम्यान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe