ओ-हो आता फोक्सवॅगन देखील आली मार्केटमध्ये! फोक्सवॅगन सेडान व्हर्चसचे दोन स्पेशल व्हेरिएंट केले लॉन्च, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

फोक्सवॅगन व्हर्चसचे हे दोन्ही व्हेरियंट 1.0- लिटर टिएसआय पेट्रोल आणि 1.5- लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन पर्याय मध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Published on -

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रसिद्ध अशा कार उत्पादक कंपन्यांनी अनेक नवनवीन व्हेरियंट कार बाजारपेठेत लॉन्च केल्यामुळे या कालावधीत कुणाला कार खरेदी करायचे असेल तर त्यांच्या करिता आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

यामध्ये ज्याप्रमाणे प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकी तसेच  महिंद्रा आणि महिंद्रा त्यासोबत टाटा मोटर्स आणि इतर अनेक कार उत्पादक कंपन्यांनी परवडणाऱ्या किमतीत भन्नाट फीचर्स आणि चांगले मायलेज देणाऱ्या कार लॉन्च केले आहेत.

या स्पर्धेत आता फोक्सवॅगन इंडिया  या कंपनीने देखील एन्ट्री केली असून फोक्सवॅगनने व्हर्चस जीटी लाईन आणि व्हर्चस जीटी प्लस स्पोर्ट असे दोन भन्नाट व्हेरियंट लॉन्च केले आहेत.

या दोन्ही व्हेरियंटचा प्रीमियम लूक आणि डिझाईन तसेच उत्कृष्ट फीचर्ससह या दोन्ही कार सुसज्ज आहेत. फोक्सवॅगन व्हर्चसचे हे दोन्ही व्हेरियंट 1.0- लिटर टिएसआय पेट्रोल आणि 1.5- लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन पर्याय मध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

 फोक्सवॅगन व्हर्चस जीटी लाईनची खास वैशिष्ट्ये

फोक्सवॅगनाच्या या व्हेरियंटमध्ये ब्लॅक आऊट फ्रंट ग्रील देण्यात आले आहेत व त्यासोबतच पुढच्या आणि मागच्या बाजूला ब्लॅक बंपर आहेत. तसेच या कारची अलॉय हिल्स आणि विंग मिरर देखील ब्लॅक ट्रीटमेंटसह देण्यात आलेले आहेत व याला डार्क क्रोम फिनिश केलेले डोर हँडल, फेंडर्सवर जीटी लाईन बॅज आणि बूट लीड आणि ग्लास ब्लॅक स्पोक्स देण्यात आले आहेत.

तसेच इंटरियर म्हणजे केबिनमध्ये देखील ब्लॅक थीम देण्यात आली आहे. तसेच सर्व ब्लॅक सीट अपहोस्ट्री वरील राखाडी रंगाची स्टिचिंग तसेच दहा इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आठ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेड ॲम्बिएंट लाइटिंग, फ्रंट फॉग लॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ तसेच हिल होल्ड कंट्रोल, सहा एअरबॅग्स, इएसबी आणि मॉनिटरिंग सिस्टम देण्यात आली आहे.

 फोक्सवॅगन व्हर्चस जीटी प्लस स्पोर्टची वैशिष्ट्ये

या व्हेरियंटमध्ये देखील जीटी लाईन प्रकाराप्रमाणेच ब्लॅक आऊट ट्रीटमेंट देण्यात आली आहे. तसेच ड्युअल टोन रुफ,जिटी बॅज, रेड ब्रेक कॅलिपर, डोअर क्लेडींग तसेच सर्व ब्लॅक थीम असलेले इंटिरियर,

डॅशबोर्ड आणि स्टिअरिंग व्हील वर चकचकीत ब्लॅक इन्सर्ट, ॲल्युमिनियम पेडल्स, ब्लॅक डोअर हँडल तसेच ब्लॅक सन व्हीझर्स आणि केबिनला स्पोर्टी अपील देण्यासाठी रेड स्टिचिंगसह ब्लॅक लेदररेट अपहोलस्ट्री देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचे सगळे सुरक्षिततेविषयीचे फीचर्स देखील आहेत.

 किती आहे या दोन्ही व्हेरिएंटची किंमत?

फोक्सवॅगन व्हर्चस जीटी लाईन मॉडेलच्या 1.0- लिटर एमटी व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 14 लाख 8 हजार रुपये इतकी आहे आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 15 लाख 18 हजार रुपये आहे.

त्यासोबतच फोक्सवॅगन व्हर्चस जीटी प्लस स्पोर्ट मॉडेलच्या 1.5- लिटर मॅन्युअल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 17 लाख 85 हजार रुपये असून 1.5- लिटर डीसीटी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 19 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News