Numerology:- ज्योतिषशास्त्र,अंकशास्त्र या दोन शाखा खूप महत्त्वाच्या असून व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ तसेच ग्रह नक्षत्रांची स्थिती यावरून व्यक्तींचे भविष्य तसेच त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे? व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा कसा असू शकतो याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला मिळते.
आजही हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राला व अंकशास्त्राला खूप महत्त्व असून आज देखील कुठलेही शुभ कार्य पार पाडण्याआधी मुहूर्त पाहूनच ते पार पाडण्याची पद्धत आपल्याकडे आहे.
ज्योतिषशास्त्र ऐवजी जर आपण अंकशास्त्राचा विचार केला तर यामध्ये व्यक्तीचा ज्या तारखेला जन्म झालेला असतो त्यावरून त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याचे व्यक्तिमत्व बद्दलची माहिती आपल्याला मिळत असते.
आपल्याला माहित आहेस की,जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो व त्या मुलांकावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभावाबद्दल माहिती मिळत असते.
अगदी याच अनुषंगाने जर बघितले तर कोणत्याही महिन्याच्या सात, सोळा आणि पंचवीस तारखेला म्हणजेच ज्या व्यक्तींचा मूलांक सात आहे त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्व आणि स्वभाव तसेच त्यांचे भविष्य इत्यादी बद्दलची माहिती आपल्याला अंकशास्त्रानुसार मिळते व त्याबद्दलची माहिती आपण बघू.
सात मुलांक असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे असते?
1- हे व्यक्ती असतात आळशी– ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या कोणत्याही सात, 16 आणि 25 तारखेला झालेला असतो ते लोक खूप आळशी असतात. कुठलेही काम करायचे म्हटले म्हणजे ते एकदम हळूपणे म्हणजेच रेंगाळत करत असतात.
पटकन कुठले काम पूर्ण करत नाहीत.तसेच त्यांना प्रत्येक कामाचा खूप मोठ्या प्रमाणावर आळस येतो व त्यामुळे ते सगळ्या गोष्टींमध्ये मागे पडतात.
2- हुशार असतात परंतु आळसामुळे मागे पडतात– हे लोक प्रचंड हुशार असतात. परंतु त्यांच्या हुशारीचा कुठलाही प्रकारचा फायदा त्यांना आयुष्यात जास्त करून होत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा आळस त्यांच्या यशाच्या मध्ये येत असतो. त्यांना यश जरी मिळाले तरी ते लवकर मिळत नाही.
यश मिळायला त्यांना बराच वेळ लागू शकतो. तसेच आजचे काम ते उद्यावर टाकतात व ही सवय त्यांच्या अपयशामध्ये कारणीभूत ठरते. कधी कधी चांगल्या आलेल्या संधी देखील त्यांच्या या वागण्यामुळे किंवा या सवयीमुळे त्यांच्या हातातून निसटते.
3- आराम करायला आवडते– या लोकांना एखाद्या आरामशीर जागा जरी मिळाली तरी त्या ठिकाणी ते थांबतात व आराम करावा असे त्यांना वाटायला लागते.
परंतु जर कामासाठी घराच्या बाहेर पडले तर लगेच कार्यशील देखील होतात. या लोकांची एक जमेची बाजू म्हणजे त्यांना अनेक नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडते.
4- वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर कामे पूर्ण करतात– कोणत्याही महिन्याच्या सात, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक हे बुद्धिमान असतात. ते आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर सगळ्या प्रकारचे कामे आरामात पूर्ण देखील करू शकतात.
कामे पूर्ण करायला त्यांना उशीर लागतो .परंतु तिचा वापर करून ते कामे पूर्ण करतातच. कामाच्या बाबतीत हे खूप स्मार्ट असतात व नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगले यश मिळवतात. लोकांची एक जमेची बाजू म्हणजे कधी कधी कमी मेहनत करून देखील आयुष्यामध्ये त्यांना जास्त यश मिळते.
5- धाडसी असतात– सात मुलांक असलेली व्यक्ती आयुष्यामध्ये खूप धाडसी असतात व कोणतेही समस्या आणि आव्हानांना ते जुमानत नाहीत व घाबरत देखील नाहीत. विपरीत परिस्थितीत ते धैर्य आणि बुद्धीचा वापर करून आव्हानांवर मात करतात. या व्यक्तींचे मन कधीही शांत राहत नाही.
6- मैत्रीमध्ये किंवा प्रेमात होते फसवणूक– कोणत्याही महिन्याच्या सात, सोळा आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि मैत्रीच्या बाबतीत मात्र बऱ्याचदा फसवणूक होते. हे लोक जर प्रेमात असतील तर त्यांचे प्रेम संबंध जास्त दिवस टिकत नाहीत.
( टीप– वरील माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या विषय आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा या माहितीचे समर्थन करत नाहीत.)