Furniture Care Tips: फक्त ‘हे’ सोपे उपाय करा आणि घरातील फर्निचर वर्षानुवर्ष चकचकीत आणि नवेकोरे ठेवा! जाणून घ्या माहिती

प्रत्येक जण महागातले महाग फर्निचर आपल्या घरामध्ये बसवतात. परंतु एवढे महागडी फर्निचरकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिले नाही किंवा त्याची वेळच्यावेळी साफसफाई केले नाही तर मात्र त्यावर माती किंवा धूळ बसते व ते खराब दिसायला लागते.

Published on -

Furniture Care Tips:- घर सुंदर ठेवण्यासाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तू किंवा स्वच्छतेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतो. घरामध्ये जर बाहेरचे कोणी आले तर त्यांना आकर्षक वाटायला हवे किंवा त्यांना प्रसन्न वाटायला हवे याकरिता आपण घराच्या सुंदरतेसाठी किंवा सजावटीसाठी अगदी छोटे छोटे फुलदाण्या किंवा आकर्षक अशा सजावटीच्या वस्तू ठेवत असतो.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये एन्ट्री केल्यानंतर सगळ्यात मनावर सकारात्मक प्रभाव जर पडत असेल तर तो म्हणजे घरात असलेले फर्निचर किंवा सोपा यांचा होय. घराच्या सुंदरतेमध्ये किंवा सजावटीमध्ये घरात असलेल्या फर्निचरचा खूप मोठा वाटा असतो.

त्यामुळे प्रत्येक जण महागातले महाग फर्निचर आपल्या घरामध्ये बसवतात. परंतु एवढे महागडी फर्निचरकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिले नाही किंवा त्याची वेळच्यावेळी साफसफाई केले नाही तर मात्र त्यावर माती किंवा धूळ बसते व ते खराब दिसायला लागते.

इतकेच नाही तर ते जुनाट देखील दिसू लागते. त्यामुळे त्याचा आकर्षकपणा कमी होतो. अशा पद्धतीने जर आपण खराब फर्निचर साफ करण्याचे ठरवले तर अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो. परंतु अपेक्षित परिणाम आपल्याला बऱ्याचदा दिसून येत नाही.त्यामुळे या लेखात आपण असे काही सोपे उपाय बघणार आहोत जे घरातील फर्निचर वर्षानुवर्ष नवेकोरे आणि चकचकीत ठेवू शकतील.

 हे उपाय करा आणि फर्निचर चकचकीत नवेकोरे ठेवा

1- ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस याकरिता खूप उपयुक्त असतो. यामध्ये लिंबाचा रस हा फर्निचरवर जमा झालेली माती आणि धूळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. तर त्यासोबत वापरलेली ऑलिव्ह ऑइल फर्निचरला चमकदार बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.

हा उपाय करण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊन ते मिक्स करावे. हे तयार मिश्रण एका मऊ कापडाने फर्निचरवर लावावे आणि काही वेळाने ते पुसून टाकावे. हा उपाय केल्याने फर्निचर नवेकोरे दिसायला लागते.

2- व्हिनेगर आणि पाणी या उपायांमध्ये दोन भाग पाणी घ्यावे व एक भाग विनेगर घ्यावे. या दोन्हीचे मिश्रण बनवून या मिश्रणाने फर्निचर पुसावे.

या मिश्रणाचा वापर केल्यामुळे फर्निचरवर पडलेले जुने डाग आणि मळ झटक्यात निघतो. त्यामुळे फर्निचर अगदी स्वच्छ आणि नवीन दिसायला लागते.

3- मेणाचा वापर फर्निचरला जर तुम्हाला दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवायचे असेल तर मेणाचा वापर फायद्याचा ठरतो. याकरिता बाजारात फर्निचर पॉलिशिंग मेण उपलब्ध असते.

हे फर्निचर पॉलिशिंग मेण फर्निचरवर लावावे आणि चांगल्या प्रकारे चोळून घ्यावे. अशाप्रकारे हे मेण फर्निचरच्या लाकडावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवरण तयार करते व ज्यामुळे फर्निचर चमकदार दिसते व त्याचे संरक्षण देखील होते.

4- साबण आणि गरम पाणी घरातील फर्निचरवर जर थोडीफार धुळ किंवा मळ बसलेला असेल तर तो काढण्याकरिता तुम्ही गरम पाणी आणि साबणाचा वापर करू शकतात.

यामध्ये गरम पाणी आणि मऊ साबणाचा वापर करून साध्या कपड्याने हे पाणी फर्निचरवर हलक्या हाताने पुसावे. हा उपाय केल्याने फर्निचर ताबडतोब स्वच्छ होते व त्यात चमकदारपणा येतो.

5- कोकम तेल खोबरेल तेल फर्निचरला जास्त वर्ष झाल्यानंतर ते बऱ्याच प्रकारे खराब दिसायला लागते. त्यामुळे तुम्ही फर्निचरवर जर रेगुलर कोकम किंवा खोबरेल तेलाचा एक हात मारावा म्हणजेच वापर करावा.

त्यामुळे फर्निचरच्या लाकडाला नैसर्गिक पद्धतीने चमक मिळते आणि ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. साध्या भाषेत सांगायचे म्हणजे कोकम किंवा खोबरेल तेल लाकडी फर्निचरला नैसर्गिक पॉलिशिंग आणि चमक देण्याचे काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!