आता तुमच्या लेकीला विधानसभेत पाठवा…नगरच्या मोहटादेवी यात्रोत्सवात फुलांची उधळण ! तिच गर्दी, आणि तोच उत्साह

अभिषेक कळमकर म्हणाले, आता तुमच्या लेकीला विधानसभेत पाठवा

Published on -

खासदार नीलेश लंके व जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रोत्सवामध्ये तिच गर्दी आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. पारनेर तालुक्याप्रमाणेच नगर तालुक्यातील महिला मोठया उत्साहाने या यात्रोत्सवात सहभागी झाल्या होत्या. फुलांची उधळण करीत खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांचे नगरकरांनी जंगी स्वागत केले.

पारनेर तालुक्यातील यात्रोत्सावाची सांगता झाल्यानंतर बुधवारी नगर तालुक्यातील देहरे, नांदगांव, शिंगवे नाईक, इस्लामपुर, पिंप्री घुमट, वडगांव गुप्ता, हमीदपुर, हिंगणगांव, खातगांव टाकळी, टाकळी खातगांव, हिवरे बाजार, विळद, निमगांव घाणा, कर्जुने खारे, नवनागापुर, इसळक, निंबळक, नेप्ती, निमगांव वाघा, जखणगांव आदी गावांमधील महिला या यात्रोत्सवात सहभागी झाल्या होत्या. नगर शहराच्या वतीने मा. महापौर अभिषेक कळमकर व प्राची कळमकर यांनी उपस्थित माता-भगिनींचे स्वागत केले. यावेळी प्रियंका लामखडे, राजेंद्र नरवडे, अजय लामखडे, वसंत पवार, शिवा पाटील होळकर यांचीही भाषणे झाली. नगर तालुका व शहर यात्रेसाठी प्रिती कळमकर, शिवा पाटील होळकर, अजय लामखडे, प्रियंका लामखडे, वसंत पवार यांनी विशेष परीश्रम घेतले.

यावेेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती वसंतराव पवार, बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील होळकर, अजय लामखडे, राजू नरवडे, संजय पाटील, संजय जपकर, घनश्याम म्हस्के, अण्णासाहेब शिंदे, बी आर कर्डीले, तात्यासाहेब कर्डीले, अनिल नरवडे, गौरव नरवडे, बाबा काळे, हरिदास जाधव, नंदकुमार सोनवणे, नितीन भांबळ, अनिल लांडगे, दत्ता खताळ, रमेश काळे, व्ही डी काळे, सुनील कोकरे, बाळासाहेब पानसांबळ, संजय गिरमे, बाळासाहेब पानसरे, भरत बोडके, बापू फलके, बहिरू होळकर, संभाजी गडाख, संतोष चौरे, सचिन ठाणगे, बाबासाहेब शेळके आदी उपस्थित होते.

माय-माऊल्यांविषयी आस्था
गेल्या आठ वर्षांपासून खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून मोहटादेवी यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नीलेश लंके हे लोकसभेत पोहचले तरीही त्यांनी आपला हा उपक्रम सुरूच ठेवला आहे. यावरून त्यांची सर्वसामान्य माय माऊलींविषयी असलेली अस्था दिसून येते. हा उपक्रम दरवर्षी सुरू राहील असा विश्‍वास आहे. अभिषेक कळमकर मा. महापौर, नगर

तुमची लेक विधानसभेत पाठवा
लोकसभा निवडणूकीमध्ये खा. नीलेश लंके हे उतरल्यानंतर त्यांना सर्वसामान्य जनतेचे पाठबळ मिळाले कारण गेल्या पाच-सात वर्षांमध्ये त्यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी २४ तास ३६५ दिवस घेतलेल्या परिश्रमाचे ते फळ होते. नीलेश लंके हे धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या लढतीमध्ये मोठया मताधिक्क्याने विजयी व्हावेत यासाठी अनेक माता-भगिनींनी नवस केले होते. या यात्रेच्या निमित्ताने ही नवसपुर्ती होत असल्याचाही आनंद आहे. आता खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई या विधानसभेच्या निवडणूकीतील उमेदवार असणार आहेत. त्यांचे माहेर नगर तालुक्यातीलच असल्याने तुमची लेक म्हणून राणीताईंना विधानसभेत पाठवा अशी विनंती मा. महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी केली.

यात्रेप्रती ओढ आणि उत्साहामुळे उर्जा
गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या या यात्रोत्सवात मोठया संख्येने माता-भगिनी सहभागी झाल्याबददल सर्वांप्रती कृतज्ञता. प्रत्येक दिवशी माता-भगिनींमध्ये दिसणारा उत्साह, यात्रेप्रती असलेली ओढ पाहून मला मोठी उर्जा मिळते. सर्व माता-भगिनींनी काळजीपुर्वक दर्शन घ्यावे. तिसगांव येथे सर्वांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. राणीताई नीलेश लंके मा. जि. प. सदस्य

स्वयंसेवकांनी जबाबदारी पार पाडावी
यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक माता भगिनींची काळजी घेण्याची जबाबदारी स्वयंसेवकांची आहे. ती त्यांनी चोखपणे बजवावी. फराळ, दर्शन झाल्यानंतर प्रत्येक माता-भगिनी घरी पोहचेपर्यंत प्रत्येकाने काळजी घ्यावी. सर्व माता-भगिनींना मोहटादेवी यात्रा तसेच नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा. खासदार नीलेश लंके लोकसभा सदस्य

बॅण्ड, पारंपारीक वाद्यांनी रंगत
नगरच्या यात्रोत्सवात पारंपारीक वाद्यांसह बॅण्डचाही समावेश होता. वाद्यांच्या तालावर महिलांनी ठेका धरीत देवीच्या गाण्यांवर मुक्त नृत्य करण्याचाही आनंद लुटला. महिलांमध्ये सहभागी होत राणीताई लंके या त्यांची विचारपूस करत होत्या. अनेक महिला, युवतींना त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

हाती परडी आणि गळयात कवडयांच्या माळा
हाती देवीची परडी व गळयात कवडयांच्या माळा घालून यात्रोत्सवात सहभागी झालेल्या माता-भगिनी लक्ष वेधून घेत होत्या. बाल वारकरी मुले व मुलींनी धरलेला लयबध्द ठेकाही अनेकांना भावला. फुगडया खेळत, नाचून गात माय माऊल्यांनी या यात्रोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News