महिंद्राच्या Mahindra XUV 3XO कारला पर्याय हवा का? ‘ही’ आहेत परवडणाऱ्या बजेटमधील उत्तम एसयूव्ही कार, वाचा किंमत

भारतीय कार बाजारपेठेत जर आपण बघितले तर ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर आपण एसयूव्ही सेगमेंटची विक्री पाहिली तर 2024 च्या पहिल्या सहामाहीत  झालेल्या एकूण कार विक्रीपैकी 52 टक्के वाटा एकट्या एसयूव्ही सेगमेंटचा होता.

Ajay Patil
Published:
mahindra xuv 3xo car

भारतीय कार बाजारपेठेत जर आपण बघितले तर ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर आपण एसयूव्ही सेगमेंटची विक्री पाहिली तर 2024 च्या पहिल्या सहामाहीत  झालेल्या एकूण कार विक्रीपैकी 52 टक्के वाटा एकट्या एसयूव्ही सेगमेंटचा होता.

त्यातल्या त्यात महिंद्राने नुकतीच लॉन्च केलेली लोकप्रिय एसयुव्ही XUV 300 ची अपडेटेड आवृत्ती बाजारात आणली व तिला XUV 3XO असे नाव देण्यात आले आहे.

महिंद्राच्या या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 49 हजार रुपये असून या कारला सर्वाधिक मागणी असल्याचे सध्या दिसून येते. परंतु तुम्हाला या कारला पर्याय म्हणून दुसरी एसयुव्ही खरेदी करायचा विचार असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या कारच्या पर्यायांपैकी कुठलीही कार खरेदी करू शकतात.

 या आहेत उत्तम आणि परवडणाऱ्या दरातील एसयूव्ही कार

1- मारुती सुझुकी ब्रेझा मारुती सुझुकी ब्रेझ्झा ही कंपनी तसेच देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयुव्ही पैकी एक कार असून या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 34 हजार ते 14 लाख 14 हजार रुपयापर्यंत आहे.

मारुती ब्रेजामध्ये  1.5- लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते जास्तीत जास्त 102 बीएचपी पावर आणि 137 nm चा पिक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. इतकेच नाहीतर या कारमध्ये सीएनजी पावर ट्रेनचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

2- ह्युंदाई वेन्यू हा देखील एक एसयूव्ही सेगमेंट मधील उत्तम पर्याय असून भारतीय बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख नऊ हजार ते 13 लाख 50 हजार पर्यंत आहे.

या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला असून यामध्ये नुकतीच अपडेट केलेली हुंदाई वेन्यू मध्ये 30 पेक्षा जास्तीचे सुरक्षा फीचर्स  देण्यात आलेले आहेत.

3- किया सोनेट महिंद्रा एक्सयुव्ही 3XO चा पर्याय म्हणून नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार असेल तर किया सोनेट हा एक उत्तम पर्याय आहे.

कंपनीने या कार मध्ये  1.2- लिटर पेट्रोल इंजिन, 1.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5- लिटर डिझेल इंजिन पावर ट्रेन म्हणून दिले असून भारतीय बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 7.9 लाख ते 15.7 लाख रुपयांपर्यंत आहे.

4- टाटा नेक्सन(Tata Nexon)- ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कार पैकी एक आहे. भारतीय बाजारात या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार रुपये ते टॉप मॉडेलमध्ये 14 लाख 69 हजार रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये कंपनीने  1.0- लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5- लिटर डिझेल इंजिन पर्याय दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe