अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘कोपरगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रवींद्र नारायण देशमुख (वय 48) याला पाचशे रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. रवींद्र नारायण देशमुख (वय 48) असे या जेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने हि कारवाई केली. जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर कोपरगाव तालुका पो.स्टे.ला दारूबंदीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर तहसीलदार कार्यालयात चॅप्टर केस पाठवण्यात आली होती.
सदर चॅप्टर केस बंद करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून ती दि. 12 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे पंच साक्षीदारांच्या समक्ष स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.या पथकात पोलीस निरीक्षक ला.प्र.वि उज्ज्वल पाटील, पोनि. मृदुला नाईक, पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ना महाजन , पोना. बाविस्कर,पोना. शिंपी लाप्रवि नाशिक यांचा समावेश आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved