मान्सूनचं ‘या’ तारखेला सीमोल्लंघन, आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज

महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आज आणि उद्या ही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, माॅन्सून येत्या २ दिवसात देशाचा निरोप घेणार आहे.

Published on -

Monsoon News : जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने आणि आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा उलटत चालला आहे, मात्र तरीही अजून मान्सून देशातून माघारी फिरलेला नाही. यामुळे मानसून महाराष्ट्राचे संपूर्ण देशातून कधीपर्यंत माघारी फिरणार हा सवाल आहे. दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने एक मोठी माहिती दिली आहे.

हवामान खात्याने येत्या दोन दिवसात मान्सून संपूर्ण देशातून माघारी फिरणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असणारा परतीचा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आज आणि उद्या ही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, माॅन्सून येत्या २ दिवसात देशाचा निरोप घेणार आहे.

अशा या परिस्थितीतच सध्या राज्यासहित देशातील अनेक भागांमध्ये दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला दिसत आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर आज माॅन्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे.

तो उत्तर आणि ईशान्य भारताच्या बहुतांशी भागातून आधीच माघारी फिरला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा राज्याच्या बहुतांशी भागातून माॅन्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान खात्याकडून समोर आली आहे.

दरम्यान आता पुढील २ दिवसात माॅन्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या उरलेल्या भागातून आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी फिरणार अशी शक्यता हवामान खात्यातील तज्ञांच्या माध्यमातून समोर आली आहे. एकंदरीत पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रासहित देशाचा निरोप घेणार आहे.

आज आणि उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आज अर्थातच 14 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.

शिवाय उद्या अर्थातच 15 ऑक्टोबरला कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर , गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी शेती क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe