Tourist Place:- दररोजचा तोच तोच रुटीन आणि तीच तीच कामे करून व्यक्ती कंटाळतो आणि मनामध्ये विचार सुरू होतात की कुठेतरी बाहेर फिरायला जावे आणि आपला मूड किंवा एकंदरीत वातावरण रिफ्रेश करावे किंवा स्वतःला रिचार्ज करावे असे वाटायला लागते.
त्यामुळे लागलीच आपल्या डोक्यामध्ये प्लान सुरू होतात की आता आपण एकतर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्लान बनवून कुठेतरी फिरायला जावे. फिरायला जायचे पण डोक्यात आला म्हणजे एखाद्या निसर्ग समृद्ध ठिकाणी भेट देणे किंवा गड किल्ल्याच्या ठिकाणी जाणे किंवा एखाद्या हिल स्टेशनला भेट देणे असे वेगवेगळे पर्याय डोळ्यासमोर यायला लागतात.

परंतु असे प्लान बनवताना आपल्या खिशाचा बजेट पाहणे देखील तितकेच गरजेचे असते व त्यानुसारच प्लॅनिंग केली जाते. अगदी याच अनुषंगाने तुम्ही देखील दररोजच्या कामांना वैतागला असाल व त्यामधून तुम्हाला थोडासा स्वतःसाठी मोकळा वेळ काढायचा असेल आणि कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रीप प्लान करायचे डोक्यात असेल तर तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेले व नाशिकच्या जवळ असलेले सापुतारा या हिल स्टेशनला भेट देऊ शकतात.
तसे पाहायला गेले तर हे हिल स्टेशन गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यामध्ये येते. परंतु तुम्ही या ठिकाणी भेट दिली तर त्या ठिकाणाचा निसर्ग सौंदर्याचा अद्भुत देखावा पाहून तुम्ही स्वतःलाच हरवून बसाल.
स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी सापुतारा हिल स्टेशन ठरेल फायद्याचे
1- व्हॅली व्ह्यू पॉईंट– व्हॅल्यू व्ह्यू पॉईंट हा एक महत्त्वाचा पॉईंट असून त्याला सनराइज पॉइंट म्हणून देखील ओळखले जाते. तुम्हाला जर या ठिकाणी पोहोचायचे असेल तर तुम्हाला ट्रेकिंग करून पोहोचता येते.
या पॉईंटवरून तुम्ही सापुताराच्या हिरव्यागार जंगलांचे मनोहारी दृश्य पाहू शकतात. पिकनिक करीता हे एक बेस्ट लोकेशन असून या ठिकाणहून तुम्ही सूर्योदयाचे मोहक रूप सकाळच्या वेळेस पाहू शकतात.
2- सापुतारा तलाव– सापुतारा हिल स्टेशन पासून साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा तलाव असून प्रसिद्ध पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो. हा मानवनिर्मित तलाव असून बोटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.
या तलावाच्या आजूबाजूला लहान मुलांकरिता अनेक प्रकारची उद्याने असून पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर फूड स्टॉल आणि शॉपिंग क्षेत्रे आहेत.ज्यामुळे त्या ठिकाणी फिरायला खूप मोठी पर्वणी पर्यटकांना उपलब्ध होते.
3- हतगड किल्ला– हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असून नासिक सापुतारा रोडवर हतगड या गावापासून जवळ हा किल्ला आहे. साधारणपणे 3600 फूट उंच असलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करून जावे लागते. हे एक उत्तम असे डेस्टिनेशन असून पर्यटकांसाठी एक आकर्षक असे स्थळ आहे.
या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर या ठिकाणी देखील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक किल्ला वसलेला आहे व या ठिकाणी गंगा आणि यमुना नद्यांचे जलाशय पाहायला मिळतात व या किल्ल्यावरून तुम्ही सापुताराचा अद्भुत नजारा पाहू शकतात.
4- नागेश्वर महादेव मंदिर– हे एक प्राचीन भगवान शिवाचे मंदिर असून सापुतारा तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर आहे. नागेश्वर महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजले जाते व या मंदिराला लेक गार्डन जोडलेले असल्याने या मंदिराच्या ठिकाणी शांत आणि स्वच्छ असे वातावरण आपल्याला अनुभवता येते व अध्यात्मिक वातावरणाचा सुरेख अनुभव घेता येतो.