टाटा पंच आणि टाटा टियागो इलेक्ट्रिक कार्सवर मिळत आहे बंपर सूट! या संधीचे सोने करा आणि पूर्ण करा इलेक्ट्रिक कार घेण्याचे स्वप्न

टाटा मोटर्स या देशातील अग्रगण्य असलेल्या वाहन उत्पादक कंपनीच्या अनुषंगाने बघितले तर सध्या कंपनीकडे दहा लाख रुपये पर्यंतच्या बजेटमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक हॅचबॅक अशा दोन्ही कारचा समावेश आहे.

Published on -

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार मॉडेलवर भन्नाट अशा सवलती देण्यात येत असून या कालावधीत जर कार घेतल्या तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करता येणे शक्य आहे.

अगदी याच प्रमाणे जर आपण टाटा मोटर्स या देशातील अग्रगण्य असलेल्या वाहन उत्पादक कंपनीच्या अनुषंगाने बघितले तर सध्या कंपनीकडे दहा लाख रुपये पर्यंतच्या बजेटमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक हॅचबॅक अशा दोन्ही कारचा समावेश आहे.

टाटा मोटरच्या माध्यमातून आता या सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून टाटा पंच ईव्ही व त्यासोबत इतर इलेक्ट्रिक कार वर बंपर अशा सूट दिल्या जात आहेत.

 टाटाच्या कोणत्या इलेक्ट्रिक कारवर किती मिळत आहे सवलत?

1- टाटा पंच ईव्ही टाटा मोटरच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर वीस हजार रुपयांची रोख सुट आणि 6000 रुपयापर्यंतची कार्पोरेट सुट मिळत आहे. विशेष म्हणजे ही सुट किंवा ही ऑफर 2023 आणि 24 या दोन्ही वर्षाच्या मॉडेल साठी उपलब्ध आहे.

या कारची सुरुवातीची किंमत दहा लाख 99 हजार रुपये असून मागील काही दिवसा अगोदर या कारची किंमत कंपनीने एक लाख रुपयांनी कमी केली होती.

या एक लाख रुपयांच्या कपाती नंतर या वाहनाची नवीन किंमत नऊ लाख 99 हजार रुपये ते तेरा लाख 79 हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे. ही कार 25kWh आणि 35 kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये मिळते.

2- टाटा टियागो ईव्ही टाटा मोटर्सच्या माध्यमातून टियागो इलेक्ट्रिक कारची किंमत चाळीस हजार रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे व ही कपात मात्र या हॅचबॅकच्या टॉप व्हेरिएंट करिता होती.

किमतीमध्ये कपात केल्यानंतर आता या वाहनावर 50 हजार रुपयापर्यंत रोख सवलत आणि सहा हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.

ही ऑफर या कारच्या 24kWh बॅटरी व्हेरीएंटवर उपलब्ध आहे व त्यासोबत या कारच्या 19.2kWh व्हेरियंटवर दहा हजार रुपयांपर्यंतची रोख सवलत मिळणार आहे.

टाटाच्या या इलेक्ट्रिक हॅचबॅकची एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार ते दहा लाख 99 हजार रुपये आहे. ही कार 19.2kWh बॅटरी पर्यायांमध्ये असून ती या पर्यायांमध्ये 221 किलोमीटरची रेंज देते तर या कारचा 24kWh बॅटरी पर्याय हा साधारणपणे 275 किलोमीटरची रेंज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News