दिवाळीनंतर शुक्राचा धनु राशीमधील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या भाग्याचे उघडणार दरवाजे! वाचा यामध्ये आहे का तुमची भाग्यशाली राशी?

शुक्र देखील दिवाळीनंतर म्हणजे 7 नोव्हेंबर या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे व परिवर्तन गुरुची राशी समजल्या जाणाऱ्या धनु मध्ये होणार आहे. त्यामुळे त्यानंतर होणाऱ्या या शुक्राच्या राशी परिवर्तनाचा फायदा तीन राशींना जास्त प्रमाणात होणार आहे.

Published on -

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र ग्रह हा प्रेमाचा तसेच धनवैभवाचा, सुख समृद्धीचा कारक मानला जातो. ज्याप्रमाणे इतर ग्रह राशी परिवर्तन करत असतात व त्या राशी परिवर्तनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. त्याचप्रमाणे शुक्राचे राशी परिवर्तन देखील काही राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर  ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशीमध्ये परिवर्तन करतो म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो.

त्याचप्रमाणे शुक्र देखील दिवाळीनंतर म्हणजे 7 नोव्हेंबर या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे व परिवर्तन गुरुची राशी समजल्या जाणाऱ्या धनु मध्ये होणार आहे. त्यामुळे त्यानंतर होणाऱ्या या शुक्राच्या राशी परिवर्तनाचा फायदा तीन राशींना जास्त प्रमाणात होणार आहे. नेमक्या या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.

 शुक्राची राशी परिवर्तन या तीन राशींसाठी ठरेल भाग्याचे धन समृद्धीचे

1- मेष शुक्राचे धनु राशिमध्ये जे काही राशी परिवर्तन होत आहे त्याचा मेष राशीच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होणार आहे. या व्यक्तींना नशिबाची मोठी साथ मिळणार असून जी कामे अडकलेली असतील ती देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

करिअरच्या क्षेत्रात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे व काही व्यक्तींना परदेशातून देखील लाभ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत मेष राशीच्या  व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील व पैसे कमावण्याचे नवनवीन स्त्रोत मिळतील.

तसेच प्रेम संबंध देखील चांगले राहतील व जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार आहात. परंतु या कालावधीत मेष राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

2- मिथुन शुक्र ग्रहाचे धनु राशीमधील परिवर्तन हे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. मिथुन राशि मध्ये शुक्र सातव्या भावात आहे. मिथुन राशींच्या लोकांचे नवीन मित्र या कालावधीत बनणार असून या लोकांना करिअरच्या क्षेत्रात मोठा लाभ मिळणार आहे.

एवढेच नाही तर मेष राशीच्या व्यक्तींना या कालावधीत नवीन नोकरी मिळण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच कामानिमित्त प्रवास देखील होऊ शकतो.

शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. परंतु या कालावधीत मिथुन राशींच्या व्यक्तींचा खर्च देखील वाढू शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात व आरोग्य देखील उत्तम व ठणठणीत राहील.

3- कन्या शुक्राचे धनु राशि मधील परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. कन्या राशिमध्ये सध्या शुक्र चौथ्या स्थानी असून दुसऱ्या आणि नवव्या भावात स्वामी असल्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू शकते. यामुळे या लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळते.

तसेच शुक्राच्या या परिवर्तनामुळे कार्यक्षेत्रात या व्यक्तींची मेहनत आणि काम पाहून त्यांचे वरिष्ठ खूश होतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कन्या राशींच्या व्यक्तींना यामुळे प्रमोशन किंवा पगारात वाढ देखील मिळू शकते.

मानसन्मान वाढीस लागेल व व्यवसायामध्ये असाल तर खूप लाभ मिळू शकतो. नात्यांमध्ये आनंद पाहायला मिळेल व प्रेमात असाल तर प्रेम संबंध मजबूत होतील.

(टीपवरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. आम्ही या माहितीचे समर्थन किंवा कुठलाही प्रकारचा दावा करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News