दिवाळीत मार्केट गाजवायला आली ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक! 20 मिनिटात फुल चार्ज करा आणि पळवा 200 किमी; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण अशी वाहने उत्पादित करण्यात येत असून त्यांची लॉन्चिंग देखील करण्यात येत आहे.तसेच अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी देखील आता कमीत कमी किमतीतल्या बाईक लॉन्च केल्या असून यामध्ये इलेक्ट्रिक बाइकचा देखील समावेश आहे.

Published on -

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण अशी वाहने उत्पादित करण्यात येत असून त्यांची लॉन्चिंग देखील करण्यात येत आहे.तसेच अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी देखील आता कमीत कमी किमतीतल्या बाईक लॉन्च केल्या असून यामध्ये इलेक्ट्रिक बाइकचा देखील समावेश आहे.

पेट्रोल बाईकच्या तुलनेमध्ये आता दिवसेंदिवस इलेक्ट्रिक बाइकचा वापर वाढताना दिसून येत असल्यामुळे अनेक इलेक्ट्रिक बाइक उत्पादक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर लॉन्च केलेले आहेत.

या अनुषंगाने जर आपण बघितले तर चेन्नई येथील इलेक्ट्रिक स्टार्टअप Raptee. HV ने नुकतीच पहिली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक मोटरसायकल देशांतर्गत बाजारात विक्रीकरिता लॉन्च केली असून या इलेक्ट्रिक बाइकचे वैशिष्ट्य जर बघितले तर याबाबत कंपनीने माहिती दिली की, या बाईकच्या डिझाईनमध्ये संपूर्ण जगातील इलेक्ट्रिक कार साठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे त्याचा वापर या बाईकच्या डिझाईनमध्ये करण्यात आला आहे.

 कशी आहे ही बाईक?

ही बाईक हाय व्होल्टेज म्हणजेच एचव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली देशातील पहिली मॉडेल असून जी युनिव्हर्सल चार्जिंग सिस्टमसह येते. याचा वापर इलेक्ट्रिक कार मध्ये होतो. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही ऑनबोर्ड चार्जरसह येते.

जर या बाईकचा लूक आणि डिझाईन बघितली तर ती साधारणपणे स्पोर्ट बाईक सारखी दिसते. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये स्टायलिश असे एलईडी हेडलाईट देण्यात आले आहेत व त्यासोबत टच स्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आले आहे.

तसेच या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जीपीएस नेव्हिगेशन, बॅटरीचे आरोग्य तसेच बाईकचा वेग इत्यादी माहिती देखील मिळते. या बाईकचे सीट स्प्लिट प्रकाराचे असून मागच्या बाजूला ग्रॅब हँडल्स देण्यात आले आहे.

 या इलेक्ट्रिक बाइकची पावर आणि परफॉर्मन्स

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 5.4kWh क्षमतेची 240 व्होल्ट बॅटरी दिली असून एका चार्जमध्ये 200 km च्या आसपास रेंज देते. कंपनीचा दावा आहे की ऑन रोड ही बाईक पूर्ण चार्ज केल्यानंतर कमीत कमी 150 किलोमीटरची रेंज देण्यात सक्षम आहे. या बाईकची इलेक्ट्रिक मोटर 22kW चा पिक पावर जनरेट करते.

वेग म्हणजेच पिकअपच्या बाबतीत देखील ही बाईक उत्तम असून 3.6 सेकंदात शून्य ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. या बाईकचा टॉप स्पीड ताशी 135 किलोमीटर असून यामध्ये तीन वेगवेगळे रायडिंग मोड देण्यात आलेले आहेत व यामध्ये इकॉनोमी, पावर आणि स्प्रिंटचा समावेश आहे.

जर आपण या इलेक्ट्रिक बाइकमध्ये देण्यात आलेले चार्जिंग पर्याय बघितले तर तुम्ही सामान्य घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून देखील ही बाईक चार्ज करू शकतात. तसेच बॅटरी चार्जिंग स्टेशनवर फास्ट चार्जर च्या मदतीने देखील चार्ज करता येते.

बॅटरी चार्ज होण्यासाठी लागणाऱ्या वेळाच्या बाबतीत कंपनीने दावा केला आहे की,ही इलेक्ट्रिक मोटर सायकलची बॅटरी चाळीस मिनिटांमध्ये  80% पर्यंत चार्ज होऊ शकते. वीस मिनिटं तुम्ही चार्ज केली तरी पन्नास किलोमीटरची रेंज तुम्हाला मिळेल. घरगुती चार्जरचा वापर केला तर एक तासात ऐंशी टक्के चार्ज होते.

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीने IP67 रेटेड बॅटरी पॅक वापरला असून सूर्यप्रकाश तसेच पाणी व धुळीपासून हा पूर्णपणे संरक्षित आहे.विशेष म्हणजे कंपनीने या बाईकच्या बॅटरीवर आठ वर्षापर्यंत किंवा 80 हजार किलोमीटर पर्यंतची वारंटी दिली आहे.

या बाईकमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघितले तर 320 मीमी डिस्क ब्रेक व मागच्या बाजूला 230 mm डिस्क ब्रेक दिला आहे. हे ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच एबीएसने सज्ज आहेत.

 किती आहे या इलेक्ट्रिक बाइकची किंमत?

कंपनीच्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक बाइक दोन लाख 39 हजार रुपये एक्स शोरूम सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली असून ती सफेद, लाल, राखाडी आणि काळा अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. सर्व रंगांमधील बाईकची किंमत एक सारखीच आहे.

कंपनीच्या माध्यमातून या बाईकची बुकिंग सुरू करण्यात आलेली असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही एक हजार रुपयांमध्ये ही बाईक बुक करू शकता व पुढच्या वर्षी जानेवारीपासून पहिल्या टप्प्याची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!