Vastu Tips: घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे घड्याळ? लावाल चुकीच्या दिशेला तर….. वाचा काय म्हणते वास्तुशास्त्र?

वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घड्याळ योग्य दिशेला लावणं देखील खूप महत्त्वाचे आहे व ते जर चुकीच्या दिशेला लावले गेले तर मात्र आयुष्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतात व घरातील सुख शांती देखील नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणं खूप गरजेचे आहे.

Ajay Patil
Published:
vastu tips

Vastu Tips:- ज्याप्रमाणे भारतीय परंपरेमध्ये ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्राला महत्त्व आहे. तितकेच अनन्य साधारण महत्त्व हे वास्तुशास्त्राला आहे. आपल्याला माहित आहे की, घराचे बांधकाम तसेच घराचे अंतर्गत रचना किंवा घरामध्ये कुठली गोष्ट कोणत्या ठिकाणी ठेवावी किंवा कोणत्या ठिकाणी लावावी? याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती वास्तुशास्त्रामध्ये दिलेली असते.

घरामध्ये नेमकी कोणती गोष्ट कुठे ठेवावी? याला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे.समजा एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली गेली तर तिचे विपरीत परिणाम संपूर्ण कुटुंबावर पाहायला मिळतात. त्यामुळे बरेच व्यक्ती हे वास्तुशास्त्रानुसार घराची रचना किंवा घरातील वस्तूंची मांडणी करत असतात.

अगदी याच अनुषंगाने जर आपण बघितले तर प्रत्येकाच्या घरात असलेले घड्याळ नेमके कोणत्या दिशेला लावावे याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे.

वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घड्याळ योग्य दिशेला लावणं देखील खूप महत्त्वाचे आहे व ते जर चुकीच्या दिशेला लावले गेले तर मात्र आयुष्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतात व घरातील सुख शांती देखील नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणं खूप गरजेचे आहे.

 वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावू नये?

घड्याळ लावण्याची योग्य दिशा किंवा चुकीची दिशा याबद्दल जर आपण माहिती घेतली तर वास्तुशास्त्र सांगते की, घड्याळ कधीही घराच्या पश्चिम दिशेला लावू नये. जर पश्चिम दिशेला घड्याळ लावलं तर ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

जर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर घड्याळ लावलं तर ते कुटुंबात आर्थिक समस्या तर आणतेच परंतु संपूर्ण जीवनामध्ये अनेक विपरीत समस्या निर्माण करू शकते. पश्चिम दिशेला लावलेले घड्याळ तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू शकते व आर्थिक समृद्धता देखील नष्ट होण्याची शक्यता असते.

तसेच संपूर्ण कुटुंबावर गरिबीची कुऱ्हाड कोसळू शकते. त्यासोबतच घराच्या प्रवेशद्वारावर देखील घड्याळ लावू नये. तसेच बेडच्या जवळ किंवा बेडच्या वर देखील घड्याळ लावू नये.

बऱ्याचदा आपण पाहतो की घरामध्ये एखादे बंद घड्याळ असते व त्यामध्ये बिघाड झालेला असतो. त्याबद्दल वास्तुशास्त्र सांगते की असे बंद घड्याळ कोणत्याही परिस्थितीत घरामध्ये ठेवू नये. कारण अशा पद्धतीने बंद घड्याळ घरात ठेवणे हे अशुभ मानले जाते.

 वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्या दिशेला घड्याळ लावावे?

त्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावू नये हे सांगितलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे घड्याळ कोणत्या दिशेला लावणे चांगले ठरते याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे.

याबद्दल वास्तुशास्त्र सांगते की,घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेली जी काही भिंत आहे त्यावर घड्याळ लावणे हे चांगले मानले जाते.

( टीप वरील माहिती वाचकांसाठी माहिती म्हणून सादर केलेली आहे. या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कोणत्याही प्रकारचा दावा अथवा समर्थन करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe