Car Discount Offer:- सणासुदीच्या या सगळ्या कालावधीमध्ये ई-कॉमर्स प्लेटफॉर्मस जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून भरघोस अशा सवलतीच्या ऑफर्स ग्राहकांना देण्यात येत असल्यामुळे या कालावधीत अनेक घरगुती उपयोगाच्या वस्तू तसेच कार किंवा बाईक खरेदी वर चांगल्या प्रकारे पैशांची बचत करता येणे शक्य आहे.
अगदी वाहन उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या प्रसिद्ध कंपन्या देखील डिस्काउंट ऑफर देत असून या कालावधीत ग्राहकांना चांगल्या सवलतीमध्ये कार घेऊन पैशांची बचत करता येणार आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर निसान इंडिया ही कार उत्पादक कंपनी देखील खूप प्रसिद्ध असून या कंपनीने अलीकडेच आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारामध्ये आणले असून अगोदरच्या मॉडेलमध्ये काही किरकोळ बदल करून हे नवीन मॉडेल आणण्यात आले आहे.
त्यामुळे अगोदरच्या मॉडेल पेक्षा हे मॉडेल चांगले दिसते. जर आपण न्यूज वेबसाईट ऑटोकार इंडियाचा रिपोर्ट बघितला तर त्यानुसार निसान इंडियाने ऑक्टोबर महिन्यात मॅग्नाइट एसयुव्हीवर चांगल्या प्रकारची डिस्काउंट ऑफर जारी केली आहे.
निसान इंडिया देत आहे मॅग्नाइट एसयुव्हीवर डिस्काउंट
निसान इंडियाने नुकतीच नवीन मॅग्नाइट फॅसिलिफ्ट लॉन्च केली व त्यानंतर डीलर्स कडे जास्तीचा स्टॉक आता शिल्लक आहे. त्यामुळे तो स्टॉक क्लिअर करण्यासाठी जुन्या मॉडेलवर निसान इंडियाच्या माध्यमातून साठ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात असून या डिस्काउंटमध्ये रोख सवलत,
एक्सचेंज बोनस आणि कार्पोरेट सूट व त्यासोबतच लॉयल्टी बोनसचा समावेश करण्यात आला आहे.निसान इंडियाची मॅग्नाइट ही एक उत्तम एसयुव्ही कार असून तिच्या उत्कृष्ट अशा परफॉर्मन्ससाठी ती ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे.
कशी आहे नवीन मॅग्नेट फेसलिफ्ट एसयुव्ही कार?
आपण सेफ्टी टेस्ट बघितली तर यामध्ये या कारला चार स्टार रेटिंग मिळाले असून ही कार 1.0L पेट्रोल आणि 1.0L टर्बो पेट्रोल असे दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सने सुसज्ज असून या कारचे मायलेज देखील उत्तम आहे.
मायलेजच्या बाबतीत बघितले तर ही कार एका लिटरमध्ये 20 किलोमीटरचे मायलेज देते. तसेच या कारमध्ये आठ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच या एसयुव्हीमध्ये सात इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे.
तसेच या कारमधील सीटिंग स्पेस देखील चांगली असून पाच जण आरामात बसू शकतात.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये सहा एअरबॅग देण्यात आलेल्या असून एबीएस आणि ईबीडी सारख्या सुविधा देखील आहेत.
किती आहे नवीन मॅग्नाइट फेसलिफ्टची किंमत?
जर आपण या नवीन मॅग्नाइट फेसलिफ्ट ची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती पाच लाख 99 हजार ते 11 लाख 50 हजार रुपये पर्यंत आहे.