Numerology: कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात कष्टाळू,परंतु आयुष्यात उशिरा मिळतो पैसा! वाचा आहे का यात तुमची जन्मतारीख?

Numerology:- व्यक्तीची जन्मतारीख ही त्या व्यक्तीचे भविष्यकालीन आयुष्य, तिचा स्वभाव तसेच त्याचे व्यक्तिमत्व इत्यादी बद्दल आपल्याला बरीचशी माहिती सांगून जाते. अशा प्रकारची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून मिळते.

ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेवरून किंवा जन्मवेळेनुसार आणि त्याची राशी व ग्रहताऱ्यांचा त्या राशींवर होणारा परिणाम यानुसार त्या व्यक्तीचे भविष्य किंवा व्यक्तिमत्व वर्तवत असते.

अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या जन्मतारखेवरून निघणारा त्याचा मुलांक पाहून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या आयुष्यातील भविष्यकालीन अंदाज सांगितलेला असतो.

अगदी याच अनुषंगाने जर आपण बघितले तर ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 21, 12,30 आणि तीन तारखेला झालेला असतो म्हणजे ज्या व्यक्तींचा मुलांक तीन असतो अशा व्यक्तींचे आयुष्य किंवा ते आयुष्यामध्ये कशा पद्धतीने यशस्वी होतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते? याबद्दलची माहिती देखील मिळते.

त्यामुळे या लेखात आपण वर दिलेल्या जन्मतारखांना जन्मलेल्या लोकांच्या आयुष्याबद्दल किंवा त्यांचे आयुष्य कसे असते? याबद्दल अंकशास्त्रात  सांगितलेली माहिती बघू.

 तीन मुलांक असलेल्या व्यक्ती आयुष्यात कसे असतात?

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 12, 21,3 आणि तीस तारखेला झालेला असतो त्या लोकांचा मुलांक तीन असतो. अंकशास्त्रनुसार बघितले तर मूलांक तीनचा स्वामीग्रह गुरु असून या लोकांवर गुरुचा खूप जास्त प्रभाव असतो. गुरुमुळे तीन मुलांक असलेले व्यक्ती कष्टाळू तसेच धार्मिक व धैर्यवान आणि विशेष म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व असलेले असतात.

1- असतात महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी तीन मुलांक असलेले लोक हे आयुष्यामध्ये खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि स्वाभिमानी असतात. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या किंवा आव्हाने आली तरी त्याचा धिराने सामना करतात.

जे स्वप्न पाहिलेले असेल ते पूर्ण करण्यासाठी खूप कष्टाने काम करतात व यश मिळवतात. विशेष म्हणजे या व्यक्तींना आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन नको असते.त्यांच्या आयुष्यामध्ये इतरांनी केलेला हस्तक्षेप मुळीच आवडत नाही.

2- आत्मनिर्भर असतात मुलांक तीन असलेले लोक आयुष्यामध्ये खूप आत्मनिर्भर असतात व ते त्यांच्या स्वाभिमानाला अजिबात धक्का लागू देत नाही. विशेष म्हणजे इतर लोकांकडून मदत घ्यायला त्यांना आवडत नाही.

तसेच आयुष्यामध्ये पुढचा विचार करूनच ते जगतात म्हणजेच ते दूरदर्शी असतात व भविष्यात काय घडू शकते याचा आधीच अंदाज त्यांना येत असतो.

3- आयुष्यात उशिरा मिळते यश आणि पैसा ज्या व्यक्तींचा मुलांक तीन आहे अशा लोकांचे सुरुवातीचे आयुष्य हे खूप मेहनती  असते व सुरुवातीच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये खूप आर्थिक समस्या उद्भवतात.

परंतु नंतर मात्र आर्थिक स्थिती मजबूत राहते. हे लोक प्रामुख्याने धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यामध्ये आवड असणारे असतात व अभ्यासू वृत्तीचे असतात. तसेच या लोकांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा साठा कधीही कमी होत नाही.

4- प्रेमसंबंध टिकत नाहीत मुलांक तीन असलेले जे लोक आहेत त्यांचे प्रेमसंबंध मात्र फार काळ टिकत नाही. जेव्हा हे लोक प्रेमसंबंधांमध्ये असतात तेव्हा देखील ते स्थिर नसतात. याउलट मात्र वैवाहिक आयुष्यामध्ये ते सुख समृद्ध असतात व त्यांचे वैवाहिक आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदत असते.

( टीपवरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली असून या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा दावा करत नाही.)