मारुती स्विफ्ट आली आता नवीन अवतारात! मारुतीने लाँच केली स्विफ्टची धमाकेदार स्पेशल एडिशन ‘ब्लिटझ’; कमी किमतीत मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये

Maruti Swift Blitz: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये बाईक तसेच कार लॉन्च केल्या जात असून ग्राहकांना आता त्यामुळे बजेट आणि आवडीनुसार वाहन खरेदी करणे शक्य झालेले आहे.

बाईक उत्पादन असो किंवा कार उत्पादन यामध्ये भारतातील आणि जगातील नामवंत आणि प्रसिद्ध अशा कंपन्यांनी अनेक वाहने उत्पादित केलेली आहेत.

या अनुषंगाने जर आपण कार उत्पादक क्षेत्रातील अग्रगण्य आणि तितकीच प्रसिद्ध असलेली मारुती सुझुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अगोदर पासून ग्राहकांच्या पसंतीस असलेली मारुती स्विफ्टची ब्लिटझ तब्बल पाच प्रकारांमध्ये लाँच केली असून

या नवीन स्विफ्टमध्ये आता अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर आता या स्पेशल एडिशनमध्ये रियर अंडर बॉडी स्पॉयलर, स्पॉयलर ओव्हर द बूट, फॉग लॅम्पस तसेच एल्लुमिनेटेड डोअर सिल्स, डोअर व्हिजन आणि साईड मोल्डिंग दिलेली आहे.

 कसे आहे मारुती स्विफ्ट ब्लिटझचे इंजिन?

मारुती सुझुकीने या स्विफ्टच्या नवीन स्पेशल एडिशनमध्ये 1.2- लिटर तीन सिलेंडर इंजिन दिले असून जे पेट्रोलवर 80 एचपी आणि 112 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी वर 70 hp ची पावर आणि 112 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

पेट्रोल प्रकारामध्ये या कारमध्ये एक मानक पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच पाच स्पीड एएमटी पर्याय देखील बेस्ट व्हेरियंट वगळता सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुझुकीने स्विफ्ट ब्लिटज LXI, VXI, VXI AMT, VXI(O) आणि VXI(O) AMT या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. मारुती स्विफ्ट ब्लिटझ सणासुदीच्या हंगामाकरिता मारुतीची स्पेशल पाचवी एडिशन असून विक्री वाढवण्याकरिता कंपनीच्या माध्यमातून हा ब्रँड आणण्यात आलेला आहे.

 किती आहे मारुती स्विफ्ट ब्लिटझची किंमत?

या कारची किंमत सहा लाख 49 हजार ते आठ लाख दोन हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे. तसेच कंपनीच्या माध्यमातून 49 हजार 848 रुपयांचे किट या कारच्या खरेदीदारांना मोफत दिले जात आहे.