सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सासरीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे घडली आहे.

पूनम अमोल कासार (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी की, पूनमचे निमगाव खुर्द येथील अमोल आबासाहेब कासार याच्याशी डिसेंबर 2019 मध्ये लग्न झाले होते.

त्यानंतर सातत्याने तिला सासरच्यांनी शुल्लक कारणांसह पैशांवरुन मानसिक व शारीरिक त्रास दिला. दरम्यानच्या काळात समजूत काढूनही सासरच्यांनी तिला त्रास देण्याचे चालूच ठेवले.

अखेर वैतागल्याने तिने सासरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी विवाहितेचा भाऊ सौरभ विलास हासे (रा.चिखली) याने तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती अमोल कासार,

सासरा आबासाहेब नामदेव कासार आणि सासू अलका आबासाहेब कासार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment