भंडारदरा धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करावा व वॉटर म्युझियम उभारावे! सत्यजित तांबेंचा सरकारला प्रस्ताव

सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचे आपण बघितले. नेमकी सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले गेले व माध्यमांमधून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या.

Ajay Patil
Published:
satyjit tanbe

Ahilyanagar news : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरू असताना यामध्येच बातमी आली होती की,सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचे आपण बघितले.

नेमकी सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले गेले व माध्यमांमधून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या.

परंतु या सगळ्या प्रकरणावर मात्र स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,ही भेट राजकीय नव्हती तर भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्याबाबत होती असे त्यांनी म्हटले.

 सत्यजित तांबे यांनी सरकारला दिला भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवाचा प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले भंडारदरा धरण हे  जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असे धरण असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला येत्या 2026 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने या धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करावा तसेच या धरणाच्या ठिकाणी  भव्य असे वाटर म्युझियम उभारावे असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला दिला आहे.

याकरिता सत्यजित तांबे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या कार्यालयात  जाऊन भेट घेतली. परंतु या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे आपण बघितले.

परंतु यावर बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले की, भंडारदरा धरणाला 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शताब्दी महोत्सवानिमित्त जलसंपदा व पर्यटन विभाग यांनी वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करावे व त्या ठिकाणाच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन व चालना देण्याकरिता एक आराखडा तयार करावा तसेच या ठिकाणी वॉटर म्युझियम साकारावे अशा पद्धतीची मागणी आपण केली असल्याचे त्यांनी म्हटले.

वॉटर म्युझियम करिता जागेची आवश्यकता असून यावर गोदावरी पाटबंधारे नियमक मंडळाची नुकतीच बैठक देखील पार पडली असून या झालेल्या बैठकीत जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याचा निर्णय झालेला आहे.

या संदर्भातली जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती फडणवीस यांच्या कार्यालयात सादर करण्यासाठी मी गेलो होतो असे देखील सत्यजित तांबे यांनी म्हटले व यावेळी आपली व फडणवीस यांची भेट झाली नाही असे देखील त्यांनी सांगितले. यामुळे या भेटीमागे कुठल्याही प्रकारचे राजकीय कारण न होते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe