Ahilyanagar News:- महायुती मधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाने रविवारी त्यांची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली व त्या खालोखाल महायुतीचाच घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून देखील जवळपास 17 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली व त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप देखील करण्यात आले.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या गळ्यात परत उमेदवारीची माळ टाकण्यात आली असून कोपरगाव मधून आशुतोष काळे यांना परत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे ते आता 25 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना परत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून
त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एबी फॉर्म देखील दिला असल्याने आशुतोष काळे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोमवारी जवळपास सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली व या पहिल्या यादीमध्ये आशुतोष काळे यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचे दिसून आले.
आशुतोष काळे मागच्या काही महिन्यांपासून करत होते निवडणुकीची तयारी
आपण मागील काही दिवसांपासून बघितले तर आमदार अशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील रस्ते तसेच वीज, पाणी व आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्न मार्गी लावले असून सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणी सोडवून मतदार संघाला विकासाची दिशा दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले.
त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये जे काही कामे केले आहेत त्या कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी जवळपास मागील काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेली होती व तेव्हापासूनच ते निवडणुकीच्या तयारीला लागलेले होते.
शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
आशुतोष काळे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभा देखील घेणार आहेत. या सभेनंतर ते शहराच्या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून अर्ज दाखल करणार आहेत.