दिवाळीमध्ये मारुती सुझुकीची ‘बलेनो रिगल’ करणार मार्केट जाम! परवडणाऱ्या किमतीत होईल कार घेण्याचे स्वप्न पूर्ण; वाचा कारची वैशिष्ट्ये आणि किंमत

दिवाळीत कार घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची बलेनो रिगल घेऊ शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने लोकप्रिय अशी प्रीमियम हॅचबॅक  बलेनोचे एक नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केले असून या मॉडेलला बलेनो रीगल हे नाव देण्यात आलेले आहे.

Ajay Patil
Published:
maruti baleno regal

Maruti Baleno Regal Special Edition:- दिवाळी म्हटले म्हणजे एक सुखद आणि आल्हाददायक असा सणाचा कालावधी असून भारतामध्ये दिवाळी सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दिवसांच्या शुभमुहूर्तावर अनेक जण एखाद्या नवीन कामाची सुरुवात किंवा वाहन खरेदी  मोठ्या प्रमाणावर करत असतात.

वाहनांच्या बाबतीत बघितले तर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली जाते व त्यामुळेच अनेक वाहन उत्पादक किंवा कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक आकर्षक फीचर्स असलेल्या कार बाजारपेठेमध्ये लाँच केल्या जातात.

इतकेच नाही तर या कालावधीत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून ऑफर्स जाहीर केल्या जातात व या अंतर्गत ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत देखील करता येते. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदी करणाऱ्यांसाठी हा कालावधी खूप चांगला असतो.

अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला देखील या दिवाळीत कार घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची बलेनो रिगल घेऊ शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने लोकप्रिय अशी प्रीमियम हॅचबॅक  बलेनोचे एक नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केले असून या मॉडेलला बलेनो रीगल हे नाव देण्यात आलेले आहे.

या बलेनो रिगल मध्ये कंपनीने अनेक प्रकारच्या कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेसरीज देखील दिले असून त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 काय आहे खास या मारुती बलेनो रिगलमध्ये?

बलेनो रिगल या मारुती सुझुकीच्या स्पेशल एडिशनमध्ये बलेनो सोबतच कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेसरीजमध्ये अंडर बॉडी स्पॉयलर, रियर अंडर बॉडी स्पॉयलर, ड्युअल टोन सीट कव्हर, थ्रीडी मॅट, साईड मोल्डिंग, मड फ्लॅप, तीन डी बुटमॅट,

ग्रील आणि रियर साठी क्रोम गार्निश, स्टिअरिंग कव्हर, फॉग लॅम्प, व्हॅक्युम क्लिनर तसेच बॉडी कव्हर, विंडो कर्टेन, रियर पार्सल ट्रे, डोअर वायझर, नेक्सा कुशन, लोगो प्रोजेक्टर लॅम्प आणि क्रोम डोर हँडल सह इतर ॲक्सेसरीज दिलेले आहेत.

या ॲक्सेसरीज पॅकेजेची किंमत व्हेरिएंटाच्या आधारावर असून ती  45 हजार 829 रुपयापासून ते 60199 पर्यंत आहे. परंतु आता मात्र ही ॲक्सेसरीज पॅकेज मोफत देण्यात येत आहे.

 कसे आहे मारुती बलेनो रिगल स्पेशल एडिशनचे इंजिन?

मारुती सुझुकीची बलेनो ही प्रीमियम हॅचबॅक कार असून यामध्ये 1.2 लिटर सिलेंडरचा नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 90 hp ची पावर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. तसेच ट्रान्समिशन पर्याय बघितले तर यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटीचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

 किती आहे मारुती बलेनो रिगल एडिशनची किंमत?

मारुती बलेनो ची सुरुवातीची किंमत सहा लाख 66 हजार रुपये असून टॉप मॉडेल हे नऊ लाख 83 हजार रुपये एक्स शोरूम या किमती पर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe