Bajaj Pulsar N125 Bike:- भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या बाईक उत्पादक कंपन्या बघितल्या तर यामध्ये बजाज ऑटो ही एक प्रसिद्ध अशी कंपनी असून त्या कंपनीच्या अनेक बाईक भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय अशा आहेत. त्यातल्या त्यात बजाज ऑटोची बजाज पल्सर ही बाईक शेतकऱ्यांपासून तर तरुणांपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय व पसंतीस उतरलेली बाईक आहे.
त्यामुळे बजाज ऑटोच्या माध्यमातून पल्सरमध्ये अनेक नवनवीन मॉडेल लॉन्च करण्यात आली असून नुकतीच 21 ऑक्टोबर रोजी बजाजने 125 सेगमेंटमध्ये बजाज पल्सर N125 नवीन बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे.
बजाज पल्सरचे अगोदरचे जे काही व्हेरियंट आहेत त्यापेक्षा या नवीन बजाज पल्सर एन 125 मध्ये जास्त फीचर्स देण्यात आलेली आहेत. तसेच अगोदर पेक्षा या नवीन पल्सरमध्ये उत्तम असा स्फोर्टी लुक देण्यात आलेला आहे.
त्यामुळे बजाजची ही नवीन पल्सर जर तुम्हाला या दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही बाईक लोन घेऊन देखील खरेदी करू शकणार आहात. त्यामुळे या लेखात आपण या बाईकवर जर तुम्ही लोन घेतले तर दरमहा किती हप्ता भरावा लागेल? बाबतची माहिती थोडक्यात बघणार आहोत.
किती आहे बजाज पल्सर N125 ची किंमत?
बजाजने ही पल्सर एन 125 बेस आणि टॉप अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केलेली आहे.नवीन बजाज पल्सर एन 125 च्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती 94 हजार 707 रुपये आहे.
11000 रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर किती भरावा लागेल ईएमआय?
या दिवाळीमध्ये जर तुम्हाला बजाज पल्सर एन 125 खरेदी करायचे असेल तर तुम्ही अकरा हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करून देखील ही बाईक खरेदी करू शकतात.जर तुम्ही 11000 रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला जवळपास 97,844 रुपयांचे लोन घ्यावे लागेल.
हे लोन जर तुम्हाला नऊ टक्के दराने तीन वर्षांसाठी मिळाले तर तुमचा महिन्याला या बाईकसाठी हप्ता 3111 रुपयांचा असेल. तुम्हाला या बाईक साठी एकूण एक लाख 11 हजार 996 रुपये द्यावे लागतील.
जेव्हा तुम्ही तीन वर्षात या घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड कराल तेव्हा तुम्हाला बाईकच्या किमतीपेक्षा एकूण 14 हजार 152 रुपये जास्त द्यावे लागतील.
काय आहेत बजाज पल्सर एन 125 चे वैशिष्ट्ये?
या बाईक मध्ये कंपनीने सीबीएस सिस्टम सह फ्रंट डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक दिले असून कीक स्टार्ट, मोनॉक्रोम एलसीडी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सह ही बाईक सुसज्ज आहे.या बाईकचे सीट स्प्लिट असून 9.5 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आलेली आहे.
या बाईकचे इंजिन हे 124.58cc क्षमतेचे असून ते 12 पीएस पावर आणि 11 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे इंजिन पाच स्पीड गिअर बॉक्सशी कनेक्ट असून या बाईकला 17 इंच टायर देण्यात आले आहेत.