शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून गोकुळ दौंड लढवणार अपक्ष निवडणूक? भाजपात बंडखोरी; भाजपा पक्षश्रेष्ठींकडून मनधरणीचे प्रयत्न

अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी भाजप पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Ajay Patil
Published:
gokul daund

Ahliyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागत असून अशा बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील त्या त्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केल्याचे दिसून आले. परंतु जेव्हा पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला लागल्या तसे तसे बंडखोरी करू शकतील असे चेहरे समोर यायला लागले.

यामध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ देखील याला अपवाद नाहीत. अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी भाजप पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

इतकेच नाहीतर येत्या 28 तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ज्यावेळी गोकुळ दौंड यांनी राजीनामा दिला व हे वृत्त उत्तर प्रदेशातून आलेले पक्ष निरीक्षकांना समजले तेव्हा त्यांनी दौंड यांची भेट घेत परिस्थिती जाणून घेतली व येणाऱ्या काळात निश्चितच पक्ष नेतृत्वाकडून न्याय मिळेल व पक्षामध्ये थांबून काम करावे असे आवाहन त्यांना केले.

 शेवगाव पाथर्डी मधून गोकुळ दौंड यांचा अपक्ष उमेदवारीचा इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी भाजप पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत व तशी घोषणा देखील त्यांनी केली असून येथे 28 तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

या सगळ्या परिस्थिती विषयी भाष्य करताना त्यांनी म्हटले की, जनभावनेचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता भाजपने उमेदवारी लादली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे कार्यकर्त्यांना भेटायला वेळ नाही. पक्षाध्यक्ष फक्त एक मिनिट बोलले तर उपमुख्यमंत्र्यांकडे अनेकदा भेट मागितली.

इतकेच नाहीतर आ. पंकजा मुंडे यांनी परीस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याऐवजी बघू, विचार करू अशा शब्दांमध्ये बोळवण केली. नेत्यांना जर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला आणि भेटीसाठी वेळ नाही तर अशा पक्षात न राहता स्वतंत्रपणे जनतेचा कौल घेऊ असे म्हणत त्यांनी भाजप पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत शेवगाव पाथर्डी मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

इतकेच नाही तर येत्या 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल व त्यावेळी माझ्यावर ज्यांनी टीका केली त्यांना अंदाज येईल असे देखील दौंड यांनी म्हटले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करतोय व पक्षाची लक्तरे वेशीवर टाकली जाऊ नये अशी काळजी घेत होतो. परंतु आम्हाला वेड्यात काढण्याचे काम पक्ष श्रेष्ठींनी केले. ज्या नेत्याला आपण आपला मानतो त्यांनी देखील फारशी दखल घेतली नाही.

सर्व कार्यकर्त्यांच्या मुलाखती हा सर्व फार्स असल्याचे देखील त्यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांच्या विषयी बोलताना त्यांनी म्हटले की त्यांच्यावर मतदारसंघाचा प्रचंड विश्वास व प्रेम आहे. परंतु त्यांनी देखील याबाबतीत झुलवत ठेवले व त्याचे उत्तर मतदारच आता मतभेटीतून देतील असे त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe