दिवाळीला नवीन वाहन खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत दिवाळी काळातील वाहन खरेदीसाठीचे शुभ मुहूर्त; जाणून घ्या माहिती

भारतीय परंपरेमध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व असून संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो. तसेच आपल्याला माहित आहे की जर कुणाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर बरेच जण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करतात.

Ajay Patil
Published:
diwali shubh muhurt

Shubh Muhurat In Diwali:- दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशी पासून होते व यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी असून या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होते. त्यानंतर नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व शेवटचा दिवस हा भाऊबीजेचा असतो.

भारतीय परंपरेमध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व असून संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो. तसेच आपल्याला माहित आहे की जर कुणाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर बरेच जण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करतात.

तसेच नवीन वाहन खरेदी करायचे असेल तरी देखील दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. प्रत्येक प्रकारचे वाहन दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात.तुम्हाला देखील या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करायचे असेल तर या लेखामध्ये वाहन खरेदीसाठी असलेले शुभ मुहूर्त आपण बघणार आहोत.

 धनत्रयोदशी 2024

दिवाळीची सुरुवात ही प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या दिवसापासून होते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनतेरस सण म्हणून साजरा केला जातो. जर आपण धार्मिक मान्यता पाहिली तर त्यानुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते.

त्यामुळे या दिवशी खरेदी करणे खूप शुभ असते. धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक जण नवीन कार किंवा बाईक खरेदी करतात. त्यामुळे या वर्षीच्या धनत्रयोदशीचा वाहन खरेदीचा मुहूर्त पाहिला तर तो  पुढील प्रमाणे…..

यावर्षी 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी धनतेरस साजरी केली जाणार असून त्या दिवशी तुम्ही नवीन कार किंवा बाईक खरेदी करू शकतात. धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदीचा मुहूर्त सकाळी दहा वाजून 31 मिनिटे ते पुढील दिवस म्हणजेच 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे.यामध्ये मुहूर्तानुसार बघितले तर…

 सामान्य मुहूर्त सकाळी नऊ वाजून 18 मिनिटे ते सकाळी दहा वाजून 41 मिनिटांपर्यंत

 लाभदायक मुहूर्त सकाळी 10:41 ते दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत

 अमृत मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटे ते दुपारी एक वाजून 28 मिनिटांपर्यंत

 लाभदायक मुहूर्त रात्री 7:15 ते रात्री 8:51 मिनिटांपर्यंत

 31 ऑक्टोबरला नवीन वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त

 शुभ मुहूर्त दुपारी 4:13 ते सायंकाळी 5:36 मिनिटांपर्यंत

 अमृत मुहूर्त सायंकाळी 5:36 वाजून  7: 14 मिनिटांपर्यंत

 सामान्य मुहूर्त रात्री सात वाजून 14 मिनिटे ते रात्री 8:51 मिनिटांपर्यंत

 एक नोव्हेंबर रोजीचे नवीन वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त

 शुभ मुहूर्त सकाळी 6:33 ते सकाळी 10:42 पर्यंत

 अमृत मुहूर्त सायंकाळी चार वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी 5:36 पर्यंत

 सामान्य मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून 27 मिनिटांपर्यंत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe