होंडाने लॉन्च केली फ्लेक्स इंधनावर चालणारी भारतातील पहिली CB300F 300cc बाईक! मिळतील दमदार फीचर्स आणि उत्तम मायलेज

होंडा मोटरसायकल आणि स्कूटरने  भारतामध्ये आपली प्रीमियम बाईक होंडा CB300F लॉन्च केली असून ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बाईक आहे.या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य पाहिले तर ही ३०० सीसी सेगमेंट मधील E85 इंधनावर चालणारी देशातील पहिली बाईक आहे.

Ajay Patil
Published:
honda cb300f bike

Honda CB300F Bike:- होंडा ही कंपनी बाईक आणि स्कूटर उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य व संपूर्ण भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या कंपनीच्या विविध प्रकारच्या बाईक्सने आतापर्यंत त्यांची लोकप्रियता टिकवून ठेवलेली आहे.

अगदी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत आपल्याला होंडा कंपनीच्या मोटरसायकल्स आणि स्कूटर दिसून येतात. ग्राहकांची गरज ओळखून  बाईक निर्मिती हे या कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

या अनुषंगाने होंडा मोटरसायकल आणि स्कूटरने  भारतामध्ये आपली प्रीमियम बाईक होंडा CB300F लॉन्च केली असून ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बाईक आहे.या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य पाहिले तर ही ३०० सीसी सेगमेंट मधील E85 इंधनावर चालणारी देशातील पहिली बाईक आहे.

E85 इंधन म्हणजे 85% इथेनॉल आणि पंधरा टक्के पेट्रोल पासून तयार केलेले जे इंधन असते त्याला म्हणतात व यालाच फ्लेक्स इंधन असे देखील म्हणतात. सध्या या बाईकचे बुकिंग सुरू करण्यात आलेले असून ग्राहक या नवीन बाईकसाठी होंडाच्या बिगविंग शोरूम मधून ऑर्डर देखील देऊ शकतात.

 कसे आहे या बाईकचे इंजिन?

उत्तम परफॉर्मन्ससाठी या बाईकमध्ये 300cc सिंगल सिलेंडर,फोर स्ट्रोक्स फ्लेक्स फ्युएल कंपॅटीबल इंजिन देण्यात आलेले असून हे इंजिन 24.5 एचपी पावर आणि 26 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

इंजिनला स्लीपर क्लचसह सहा स्पीड गिअरबॉक्समध्ये ट्यून केले असून त्यामुळे गुळगुळीत चढउतार आणि डाऊनशिफ्ट्स निश्चित होण्यास मदत होते व इंजिन थंड ठेवण्यासाठी ऑइल कुलिंग सेटअप देण्यात आलेला आहे.

या बाईक मध्ये संपूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून ज्यामध्ये पाच स्तर समायोजित करण्यायोग्य ब्राईटनेस आहेत. जे रायडर करिता स्पीडोमीटर,

टॅकोमीटर, गिअर पोझिशन, एक घड्याळ आणि दोन ट्रिप मीटर यासारखी मूलभूत माहिती प्रदान करण्याचे देखील महत्वपूर्ण काम करते. तसेच या बाईकमध्ये एक इथेनॉल इंडिकेटर आहे जे इथेनॉल पातळी  E85 ओलांडल्यानंतर रायडरला त्याबद्दल सतर्क करते.

 सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आहेत महत्त्वाचे वैशिष्ट्ये

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मोटरसायकलमध्ये ड्युअल चॅनल एबीएस सह ट्वीन डिस्क ब्रेक सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये समोर 276 एमएम डिस्क आणि मागील बाजूस 220 mm डिस्क देण्यात आले आहे.यामध्ये होंडा सिलेक्ट टेबल टॉर्क कंट्रोल देखील आहे जे मागील चाक स्पिन शोधते.

ट्रॅक्शन कंट्रोल करिता आणि बाईक स्थिर करण्यासाठी ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इंजिन टॉर्क कमी करते. तसेच आरामदायी रायडिंग करता यावी याकरिता सस्पेन्शन सेटअप मध्ये गोल्डन एनोडाईज्ड फिनिशसह फ्रंट डाऊन फोर्क्स आणि पाच स्टेप ऍडजेस्टेबल रियर मोनो शॉक देण्यात आले आहेत.

रात्रीच्या वेळी चांगले दिसावे याकरिता या बाईकमध्ये फ्रंट एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न सिग्नल आणि एलईडी टेल लाईट देखील देण्यात आले आहेत.

ही बाईक दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली असून ज्यामध्ये लाल आणि राखाडी रंगाचा समावेश आहे. या बाईकमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले असून सीटची उंची 789 एमएम व ग्राउंड क्लिअरन्स 177 एमएम इतका आहे.

 किती आहे या बाईकची किंमत?

होंडा मोटरसायकल आणि स्कूटरने लॉन्च केलेल्या प्रीमियम बाईक होंडा CB300F ची किंमत 1.7 लाख रुपये इतकी ठेवली आहे.या बाईकची बुकिंग देखील सुरू झालेली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe