TVS iGO Bike:- सणासुदीच्या कालावधीमध्ये बहुतेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशा वाहनांची लॉन्चिंग करण्यात येत असून यामध्ये बाईक पासून तर कार पर्यंत असणाऱ्या अनेक वाहनांचा आपल्याला समावेश करता येईल.
कारण दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदीकडे बऱ्याच जणांचा कल आपल्याला दिसून येतो व या पार्श्वभूमीवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार तसेच बाईक्स मार्केटमध्ये लॉन्च केल्यामुळे ग्राहकांना देखील अनेक पर्याय उपलब्ध होतात.
या दृष्टिकोनातून जर आपण टीव्हीएस कंपनीचा विचार केला तर या कंपनीने गुरुवारी टीव्हीएस रायडर iGO ही बाईक लॉन्च केली असून या बाईकमध्ये जुपिटर 110 प्रमाणे बुस्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत.
टीव्हीएस रेडर iGO मध्ये काय आहे खास?
या बाईकमध्ये एक नवीन बूस्ट मोड देण्यात आलेला आहे. जो असिस्ट टेक्नॉलॉजीमुळे सक्षम असून Raider रेंजच्या ज्या काही इतर गाड्या आहेत त्यांच्या तुलनेमध्ये 0.55 एनएम इतका जास्तीचा टॉर्क या गाडीला देतो.
ही बाईक 11.4 बीएचपी पावर आणि 11.75 nm चा पिक टॉर्क जनरेट करते.iGO असिस्ट सह या बाईक मध्ये शून्य ते साठ किमी प्रति तास गती मिळवण्यासाठी या बाईकला 5.8 सेकंद इतका वेळ लागतो. तसेच यामध्ये स्टार्ट/ स्टॉप सिस्टम देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे व जी या बाईकची दहा टक्के कार्यक्षमता वाढवण्याचा दावा करते.
या व्हेरियंटमध्ये न्यू नर्डो ग्रे कलर स्कीम आहे व ज्यामध्ये आकर्षक रेड स्पोर्टी अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. या बाईकमध्ये पूर्ण डिजिटल रिव्हर्स एनसीडी इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आलेली आहे व ज्यामध्ये चा SmartXonnect टेक्नॉलॉजी समाविष्ट करण्यात आलेली आहे.
यामध्ये 85 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स असून एलईडी हेडलाईट तसेच टेल लाईट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टेड फीचर्स जसे की वाईस असिस्ट, मल्टिपल राईड मोड्स आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.
कसे आहे टीव्हीएस रेडर iGO बाईकचे इंजिन?
या बाईकमध्ये 124.8 सीसी एयर/ ऑइल कुल्ड 3V इंजिन देण्यात आलेले असून जे 7500 आरपीएमवर 11.22 बीएचपी आणि 6000 rpm वर 11.75 एनएम टॉर्क जनरेट करते.
हे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्सशी कनेक्ट असून सस्पेन्शनचे काम गॅस चार्ज पाच स्टेप ऍडजेस्टेबल मोनो-शॉक सस्पेन्शन आणि टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन त्याच्या माध्यमातून पार पडते.
किती आहे टीव्हीएस रेडर iGO बाईकची किंमत?
या बाईकच्या नवीन व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 98 हजार 389 रुपये इतकी आहे.