Tourist Places In Punjab:- दररोजची धावपळीची जीवनशैली व ताणतणावाच्या आयुष्यातून काही दिवस किंवा काही क्षण आरामात निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावेत याकरिता प्रत्येक जण एखाद्या छोटेखानी ट्रीपचे प्लॅनिंग करतो व त्यानुसार कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जायचा प्लान आखला जातो.
कारण निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवल्यामुळे मन अगदी फ्रेश होते व पुन्हा आपल्याला नवीन एनर्जीने दैनंदिन आयुष्याला सुरुवात करता येते. भारतामध्ये जर आपण बघितले तर प्रत्येक राज्य हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध आहे व त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र बाहेर जर कुठे बाहेर फिरायला जायचा प्लान करत असाल तर तुम्ही कुठल्याही राज्यांमध्ये जाऊ शकतात.
कारण भारतातील प्रत्येक राज्य हे निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहे. यामध्ये जर आपण पंजाब राज्याचा विचार केला तर या ठिकाणचे काही शहरे हे पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात व या शहरांमध्ये असलेले अनेक ठिकाणे व सुंदर वातावरण मनाला मोहून टाकते. त्यामुळे तुम्हाला देखील या सुट्ट्यांमध्ये कुठे महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही पंजाब राज्याचा पर्याय निवडू शकता.
पंजाब मधील ही शहरे आहेत पर्यटनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे
1- चंदिगढ– चंदीगड हे पंजाब राज्यातील खूप महत्त्वाचे असे शहर असून हे शहर हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. चंदीगडमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर या ठिकाणी सुकाना तलाव,
रोज गार्डन तसेच छतबीर प्राणी संग्रहालय, शांती कुंज यासारखी अनेक ठिकाणी बघता येतात. एवढेच नाही तर या ठिकाणी अनेक सुंदर अशी दृश्य पाहायला मिळतात. चंदीगडला गेल्यावर तुम्हाला मनाला खूप शांतता लाभते व तुमची सुट्टी सार्थकी लागू शकते.
2- अमृतसर– अमृतसर हे पंजाब राज्यातील एक प्रमुख शहर असून प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. अमृतसर हे एक धार्मिक स्थळ असून या ठिकाणी असलेले सुवर्ण मंदिर देशातीलच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते व पर्यटकांना आकर्षित करते.
अमृतसर हे जालियनवाला बाग हत्याकांड आणि वाघा बॉर्डर करिता खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी देखील भेट दिली तरी उत्तम ठरते.
3- पटियाला– पंजाब मधील पटियाला शहर पर्यटकांच्या भेटीसाठी खूप महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी असलेले स्मारके आणि विविध असलेल्या वास्तुशैली यामुळे खूप प्रसिद्ध आहे.
तुम्ही जर इतिहास प्रेमी असाल व तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर तुम्ही पटियालाला भेट देऊ शकतात. या ठिकाणाची शांतता आणि सुंदर निसर्ग यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधले जाते व पर्यटक मोठ्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी भेट देतात. पटियालामध्ये गेल्यावर फोर्ट अँड्रॉन, रंग महाल तसेच मोतीबाग पॅलेस आणि काली मंदिर तुम्हाला पाहता येते.
4- कपूरथला– पंजाब मधील कपूरथला हे पॅरिस म्हणून ओळखले जाणारे स्थळ आहे. गुरुनानक यांनी 1499 मध्ये या ठिकाणी ज्ञान प्राप्त केले होते. कपूरथळाला पर्यटकांनी भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेले जगतजीत पॅलेस,
जगतजीत क्लब तसेच एलीसी पॅलेस,पंज मंदिर आणि कांजली वेटलँड इत्यादी ठिकाणांना पर्यटकांना भेट देता येते. त्यामुळे पंजाब मध्ये गेल्यानंतर कपूरथला हे ठिकाण खूप उत्तम आहे.