Numerology Secret : अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार केवळ व्यक्तीच्या जन्म तारखे वरून त्याची सर्व जन्म कुंडली समोर येते. व्यक्तीच्या फक्त आणि फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अधोरेखित होऊ शकते.
अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो आणि व्यक्तीचा हाच मूळांक त्याचे संपूर्ण आयुष्य कसे असेल, त्याचे व्यक्तिमत्व कसे असेल, त्याचा स्वभाव कसा आहे याचे बखान करते.

आता तुम्हाला व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मुलांक कसा काढायचा हा प्रश्न पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघत असतो.
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला झालेला असतो त्या व्यक्तीचा मुळांक हा 1+1 = 2 असतो. दरम्यान आज आपण मुळांक एक असणाऱ्या लोकांचा स्वभाव तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
या चार जन्मतारखाना जन्मलेल्या लोकांचा मूळांक 1 असतो
अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुळांक हा एक असतो. या लोकांवर सूर्य देवाची कृपा असते. कारण की एक मुळांक असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्यदेव आहे. अर्थातच सूर्यदेवाचा या लोकांवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो.
कसे असते व्यक्तिमत्व
हे लोक अत्यंत प्रामाणिक असतात. ते कोणालाही फसवत नाही. या लोकांना कोणी फसवू देखील शकत नाही. सूर्य देवाची या लोकांवर विशेष कृपा असते आणि सूर्य देवाच्या प्रभावामुळे हे लोक खूपच तेजस्वी बनतात.
या लोकांकडे एक अद्भुत शक्ती असते याच्या जोरावर ते इतरांना प्रभावित करण्याची क्षमता ठेवतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. या मुळांकाचे लोक थोडेसे रागीटही असतात.
मात्र या लोकांना इतरांची खूप काळजी असते. आपल्या आई वडिलांची हे लोक फार काळजी घेतात. नवीन गोष्टी शिकणे या लोकांना आवडते. हे लोक व्यवसायात विशेष यशस्वी होतात. या मुळांकाचे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी बिझनेस मॅन म्हणून उदयास येतात.
या लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहते. या लोकांवर कधीच पैशांचे संकट येत नाही. या लोकांकडे नेहमीच प्लॅन बी असतो यामुळे ते कधीच संकटात सापडत नाहीत आणि संकट आले तर त्यातून मार्ग काढण्यात या लोकांचा हातखंडा असतो.