Diwali Wishes 2024: तुमचे नातेवाईक आणि प्रियजनांना द्या दिवाळीच्या या सुंदर अशा हार्दिक शुभेच्छा! दिवाळी बनवा हटके आणि खास

दिवाळी सणाला सुरुवात झाली असून आज लक्ष्मीपूजनाचा महत्त्वाचा असा दिवस असून हा दिवस संपूर्ण दिवाळी सणाच्या कालावधीत खूप उत्साहाने आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हटले म्हणजे भारतातील सर्वात मोठा सण असून संपूर्ण भारतात मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो व सगळीकडे यामुळे चैतन्यमय व मंगलमय वातावरण असल्याचे आपल्याला दिसून येते.

Published on -

Diwali Wishes 2024:- दिवाळी सणाला सुरुवात झाली असून आज लक्ष्मीपूजनाचा महत्त्वाचा असा दिवस असून हा दिवस संपूर्ण दिवाळी सणाच्या कालावधीत खूप उत्साहाने आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हटले म्हणजे भारतातील सर्वात मोठा सण असून संपूर्ण भारतात मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो व सगळीकडे यामुळे चैतन्यमय व मंगलमय वातावरण असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच या दिवाळी सणाच्या निमित्ताने नातेवाईक तसेच मित्रपरिवार व प्रियजनांसोबत नाते अधिक घट्ट आणि वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे व याच दृष्टिकोनातून आपण या सणाच्या निमित्ताने नातेवाईक तसेच प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा देत असतो व यामुळे नात्यांची विण घट्ट व्हायला मदत होते. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये आज काही दिवाळीच्या सुंदर अशा शुभेच्छा पाहणार आहोत. जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांना मेसेज किंवा व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या माध्यमातून पाठवू शकतात.
दिवाळीचे सुंदर असे शुभेच्छा संदेश
1- समृद्धी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
भाग्याचा सूर्योदय झाला
वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दीपावलीची
2- सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
3- स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणी दिवाळी सणाला
सौख्य आणि समृद्धी लाभो सर्वांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
4- तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
5- मराठमोळी संस्कृती आपली
मराठमोळा आपला बाणा
मराठमोळी माणसे आपण
मराठमोळी आपली माती
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
6- चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितिजाचे रंग रांगोळी वरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
7- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा
घेऊनी येऊ नवी उमेद नवी आशा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
8- दिवाळीत दारी दीप उजळू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृद्धी नांदू दे
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
9- दिव्यांचा झगमगाट
सर्वांच्या घरातील दूर होवो अंधार
तुम्हा सर्वांच्या सोबतीमुळे
चेहऱ्यावर कायम आहे आनंद
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
10- दिवाळी सण आला, सर्वत्र प्रकाश पसरला
फटाक्यांची आतिषबाजी
मिठाईचा गोडवा नात्यांमध्येही उतरला
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
11- दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण जग उजळेल
सीता मातेला घेऊन प्रभू श्रीराम आले
प्रत्येक नगरी जणू आयोध्या सारखीच सजली
प्रत्येक दारावर दिसतोय दिव्यांचा प्रकाश
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
12- दिव्यांचा हा सण
तुमच्या घरी घेऊन येवो आनंद
वाईट गोष्टींपासून तुमचे होवो संरक्षण
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
13- घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावा दिवा
दिव्याचा प्रकाश घरात घेऊन येईल आनंद
सुख समृद्धीचा होईल वर्षाव
खास लोकांसोबत साजरा करा सण
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
14- उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट
शुभ दीपावली
15- लक्ष्मीचा सहवास आपल्या घरामध्ये नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
16- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
येऊन नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
17- अभ्यंग स्नानाने झाली पहाट, दारी रांगोळीचा थाट, सण आला प्रकाशाचा
दिव्यांची केली रास चिवडा, करंजी, फटाकेही आज दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
18- जुने जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरूप होऊन सुख-समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
19- चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्याचे तोरण दारावरी
क्षितिजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
20- सोन्या चांदीच्या नाण्यांचा होवो वर्षाव
घराचा कोणताही कोपरा संपत्तीने नसावा रिकामा
तुमचे आरोग्य निरोगी आणि चेहऱ्यावर आनंद कायम राहो
सदा रहा हसमुख, लक्ष्मी माता करेल सुखाचा वर्षाव
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe