Business Success Story:- तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर यामध्ये तुमचे वय किती आहे? तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? इत्यादी गोष्टींना महत्त्व नसते. यामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही किती प्रमाणात प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नांची दिशा कशी आहे? प्रयत्नांमध्ये सातत्य आहे का? इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील तो व्यक्ती यशस्वी होतो.
आज आपण वयाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अगदी 60 ते 70 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती देखील यशस्वी होतात आणि अगदी 20 ते 22 वर्षाच्या दरम्यानची मुलं देखील यशस्वी झाल्याचे उदाहरण भारतात आहे.

अशाच प्रकारचे जर उदाहरण घेतले तर आपल्याला तामिळनाडूच्या सूर्यवर्शनचे घेता येईल. वयाच्या 22 व्या वर्षी दोनशे रुपये पासून सुरू केलेला व्यवसाय या मुलाने चक्क दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे. याच मुलाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
दोनशे रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय पोहोचवला दहा कोटी पर्यंत
तामिळनाडू राज्यातील मदुराई मध्ये राहणाऱ्या सूर्यनने नेकेड नेचर ही डायरेक्ट टू कस्टमर म्हणजेच डी टू सी कंपनीची सुरुवात केलेली आहे व या कंपनीचे सुरुवात सूर्यन याने त्याच्या वडिलांकडून जो काही पॉकेट मनी मिळायचा तो वाचवून त्या माध्यमातून एक प्रॉडक्ट तयार करून केली.
सूर्यनने हिबिस्कस बाथ सॉल्ट हे पहिले प्रॉडक्ट तयार केले व यासाठी अवघा दोनशे रुपये खर्च आला होता. तेव्हा सूर्यन बारावीत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे त्याने हे उत्पादन त्याच्या घरच्या किचनमध्ये तयार केलेलं होतं. हे उत्पादन तयार करताना त्याने हिबिस्कसची फुले आणि मिठाचा वापर केला होता.
परंतु एवढ्या कमी वयात त्याने हे उत्पादन तयार केले. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. परंतु तरी देखील हार न मानता त्याने काम सुरू ठेवले. त्यानंतर त्याने चेन्नईमध्ये पुढील शिक्षण सुरू ठेवले व आठवड्याच्या शेवटी त्याच्या व्यवसायासाठी वेळ काढायला सुरुवात केली. या दरम्यान तो चेन्नई ते मदुराई असा प्रवास करत होता.
या प्रवासादरम्यानच त्याचे प्रॉडक्ट एक आयुर्वेदिक डॉक्टरांनी विकत घेतले व त्यामुळे सूर्यनला या माध्यमातून खूप मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला. त्यानंतर त्याने मदुराई येथील एका महाविद्यालयातून डिजिटल मार्केटिंगचे ट्रेनिंग घेतले व व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली.
सूर्यनने स्वतः डिजिटल मार्केटिंगचे क्लास घेतले व त्या माध्यमातून दोन लाख वीस हजार रुपये कमावले.याच कमावलेल्या पैशातून त्याची नेकेड नेचर कंपनी उभी राहिली. हळूहळू डिजिटल मार्केटिंगच्या क्लासेस मधून त्याने पैसे कमवायला सुरुवात केली व पुन्हा त्याच्या नेकेड नेचर या कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली व उत्पादनांची संख्या देखील वाढवली.
नेकेड नेचरच्या माध्यमातून सूर्यनने त्वचा आणि केसांची संबंधित सत्तर प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे त्याचा या ब्रँडचा आता झपाट्याने विस्तार झाला असून ग्राहकांना देखील त्याचे प्रॉडक्ट पसंतीस उतरत आहेत.
सन 2021-22 मध्ये 56 लाख रुपयांची कमाई त्याने केले होती. सूर्यनच्या या कंपनीचे मुख्य युनिट मदुराई येथे आहे व त्याचे प्रॉडक्ट केरळ, आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऑनलाइन ग्राहकांना उपलब्ध होतात. सूर्यवर्शनने अवघ्या दोनशे रुपये पासून सुरू केलेला हा व्यवसाय आता दहा कोटी रुपयांचा झाला आहे.