कमी पगार आहे तरी नो टेन्शन! फक्त ‘या’ सवयींना गुड बाय करा, बचत करून पटकन होता येईल श्रीमंत

तुम्ही किती जरी पैसा कमावला आणि तुम्हाला जर काही चुकीच्या सवय असतील तर तुम्ही पैशांची बचत करू शकत नाही आणि पैशांची बचत करणार नाही तर मात्र गुंतुतवणूक शक्यच नाही. अशा परिस्थितीमध्ये जर काही विपरीत परिस्थिती उद्भवली तर मात्र आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते व कर्जाचा डोंगर उभा राहतो.

Ajay Patil
Published:
finacial management

Good Financial Habbit:- तुम्ही किती पैसा कमावता याला महत्व नसून तुम्ही कमवलेला पैशाची बचत आणि त्या पैशांची गुंतवणूक कशा पद्धतीने करतात याला खूप महत्त्व असते. तसेच तुम्ही कमवत असलेल्या पैशांच्या बाबतीत बघितले तर तुमच्या काही सवयी देखील पैशाच्या बचतीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतात.

तुम्ही किती जरी पैसा कमावला आणि तुम्हाला जर काही चुकीच्या सवय असतील तर तुम्ही पैशांची बचत करू शकत नाही आणि पैशांची बचत करणार नाही तर मात्र गुंतुतवणूक शक्यच नाही. अशा परिस्थितीमध्ये जर काही विपरीत परिस्थिती उद्भवली तर मात्र आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते व कर्जाचा डोंगर उभा राहतो.

याकरिता तुम्ही जी काही पगार किंवा जे काही पैसे कमवत असतील त्या पैशांची बचत करणे आणि योग्य आर्थिक नियोजन तुम्ही स्वतःला लावून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे काही चुकीच्या सवयी जर तुम्हाला असतील तर त्या तुम्ही तात्काळ सोडणे गरजेचे आहे.

आज लक्ष्मीपूजन पासून सोडा या वाईट सवयी, जमा कराल चांगला पैसा

1- बचत न करण्याची सवय- पैशांची बचत व्हावी ही इच्छा प्रत्येकाची असते. परंतु बऱ्याचदा महिन्यांमध्ये अनावश्यक खर्च होतो व महिन्याचा शेवट येत नाही तोपर्यंत अकाउंटमध्ये पैसे शिल्लक राहत नाही.

त्यामुळे तुम्हाला देखील बचत न करण्याची सवय असेल तर मात्र ती सोडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा तुमचा पगार खात्यामध्ये येतो तेव्हाच तुम्ही जर बचत केली तर फायदा होतो.यामध्ये तुमचा जितका पगार असेल त्या पगारातील 20% बचत तुम्ही करायला हवीच.

2- गुंतवणुकीला सर्वश्रेष्ठ माना- तुम्ही जेव्हा पैशांची बचत करायला लागाल तेव्हा त्या बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करायला देखील तुम्ही शिकले पाहिजे. आज कालच्या कालावधीमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्ही नोकरीला लागला आणि बचत करत नसाल तर तुम्ही कमाईतील काही हिस्सा बचत करायला शिकले पाहिजे. थोडीशी जोखीम पत्करून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही स्टॉक किंवा एसआयपी इत्यादी मध्ये गुंतवणूक करू शकतात.

त्याचवेळी कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एफडी, सोन्यात किंवा सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

3- गरज नसेल तर कर्ज घेऊ नका- बऱ्याच लोकांना नको त्या गोष्टींसाठी कर्ज घ्यायची सवय असते. यामध्ये गरज नसताना कार घेणे किंवा फिरायला जाण्यासाठी देखील कर्ज घेतले जाते. अशाप्रकारे अनुत्पादक गोष्टींसाठी कर्ज घेणे टाळले पाहिजे.

कारण आपल्याला माहिती आहे की एकदा जर कर्जामध्ये माणूस अडकला तर लवकर त्यामधून बाहेर निघू शकत नाही. एकदा कर्ज घेऊन तो पैसा खर्च केला जातो परंतु नंतर फेडण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे नको त्या गोष्टींवर होणारा खर्च टाळणे गरजेचे आहे व मर्यादित प्रमाणात पैसा खर्च करणार अशी पक्की मनात खूणगाठ बांधणे महत्त्वाचे आहे.

4- आरोग्य विमा न घेणे- व्यक्तीचे आरोग्य ही खूप एक महत्त्वाची गोष्ट असते. जर आरोग्य चांगले असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट करून किंवा कुठलाही कामधंदा करून पैसा कमवू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. एखादा आजार किंवा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती केव्हा उद्भवेल याचा काहीच नेम नसतो.

अशाप्रसंगी आपल्याकडे तेवढा पैसा खर्च करायला असेलच असेही होत नाही. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करून ठेवणे ही एक काळाची गरज आहे.

आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मदत तर करतेस आणि तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाला देखील सुरक्षित करते. त्यामुळे आरोग्य विमा घेऊन ठेवणे खूप फायद्याचे आहे.

5-दिखावा करण्याची सवय- बऱ्याच व्यक्तींना दिखावा करण्यासाठी नको त्या ठिकाणी खर्च करण्याची आवड असते किंवा सवय असते. महागड्या हॉटेलमध्ये पार्टी वगैरे इत्यादींवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो.

अशी सवय जर तुम्हाला असेल तर ती तात्काळ सोडणे गरजेचे आहे. जितक्या लवकरात लवकर तुम्ही ही सवय सोडाल तितका तुम्हाला पैसा वाचवण्यामध्ये मदत होईल. नाहीतर डोक्याला हात लावल्याशिवाय पुढे तुमच्या हातात काहीच राहणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe