LIC Scheme:- बँकेच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या बचत योजना आणि मुदत ठेव योजना यांना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. कारण या योजना गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेतच आणि परतावा देखील चांगला मिळत असल्याकारणाने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर यामध्ये गुंतवणूक केली जाते.
त्या खालोखाल एलआयसीच्या अनेक पॉलिसीज देखील गुंतवणुकीसाठी खूप फायद्याचे असून अनेक पॉलिसीमधून विमा कवर तर मिळतेच परंतु चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे एलआयसीच्या अनेक योजनेतील गुंतवणूक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

एलआयसीच्या माध्यमातून अनेक प्लान किंवा पॉलिसीज राबवल्या जातात. यातील जर आपण एलआयसीची एक पॉलिसी बघितली तर यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.
या पॉलिसीचे नाव आहे एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी होय. या पॉलिसीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो.
नेमकी कशी आहे एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी?
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी ही एक टर्म पॉलिसी असून या पॉलिसी मधील गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळण्यासाठी मदत करते. या योजनेमध्ये तुम्ही कितीही कालावधी करिता गुंतवणूक करू शकतात.
या पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान एक लाख रुपये एशोर्ड करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम यामध्ये गुंतवता येते.एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज 45 रुपये प्रमाणे दर महिन्याला 1358 रुपये जमा केले तर या योजनेच्या परिपक्वता कालावधीनंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतात. एवढेच नाही तर तुम्ही जर 35 वर्षांकरिता दररोज 45 रुपये या योजनेत जमा केले तर तुम्हाला महिन्याला 16 हजार तीनशे रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
अशाप्रकारे 35 वर्षात तुमचे पाच लाख 70 हजार रुपये या योजनेत जमा होतात. यातील पाच लाख रुपये एशॉर्ड असतात व त्यावर आठ लाख 60 हजार रुपयांचा बोनस मिळतो.तर अंतिम बोनस हा 11 लाख 50 हजार रुपये इतका मिळतो. महत्वाचे म्हणजे या योजनेत तुम्हाला करात सूट मिळते व दोन वेळा बोनसचा लाभ दिला जातो.