Post Office Saving Scheme:- पैशांची गुंतवणूक ही अशी एक प्रक्रिया आहे की यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असते व दीर्घ कालावधीपर्यंत सातत्यपूर्ण रीतीने जर गुंतवणूक केली व त्यामध्ये खंड जर पडू दिला नाही तर काही वर्षांनी व्यक्ती कोटी रुपयांचा निधी जमा करू शकतो.
याकरिता फक्त योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड करणे आणि गुंतवणुकीमध्ये नियमितपणा व सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते. गुंतवणूक ही भविष्यकालीन समृद्ध आर्थिक जीवनाशी निगडित असल्यामुळे गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे.

या अनुषंगाने तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल व चांगला परतावा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्या काही अनेक योजना आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल अशा योजनेची निवड करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांपैकी जर आपण एक योजना पाहिली तर ती म्हणजे पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना होय.
पोस्ट ऑफिसची ही योजना अतिशय महत्त्वाची असून पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी सामान्य गुंतवणूकदाराला देखील करोडपती बनवण्याची क्षमता या योजनेत आहे. फक्त तुम्हाला गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा एक प्लान यामध्ये अमलात आणावा लागतो.
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना खूप महत्त्वाची असून या योजनेचा कालावधी हा पंधरा वर्षाचा असतो व या 15 वर्षाच्या कालावधीत ही योजना गुंतवणूकदाराला करोडपती बनवू शकते.
कोणत्याही व्यक्तीला या योजनेमध्ये वर्षाला जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये जमा करता येऊ शकतात आणि कमीत कमी ठेव मर्यादा ही वर्षाला 500 रुपये आहे. सध्या या योजनेवर 7.1% दराने व्याज दिले जाते.
पीपीएफ योजना व्यक्तीला करोडपती कशी बनवू शकते?
पीपीएफ योजनेमध्ये पैसे जमा करून जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला वार्षिक दीड लाख रुपये जमा करावे लागतील. या योजनेचा मॅच्युअर पिरियड म्हणजेच परिपक्वता कालावधी पंधरा वर्षाचा आहे. परंतु ही योजना तुम्हाला पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील पाच- पाच वर्षाच्या पटीत वाढवता येऊ शकते.
पीपीएफ योजनेचा कालावधी 15 वर्षाचा आहे व हे 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील खाते बंद न करता ते पाच वर्षाच्या ब्लॉगमध्ये दोनदा योगदानासह वाढवले तर या योजनेचा एकूण कालावधी पंचवीस वर्षाचा होतो. यामध्ये तुम्हाला वार्षिक दीड लाख रुपये पंचवीस वर्षासाठी आणि महिन्याला पकडले तर बारा हजार पाचशे रुपये तुम्हाला पंचवीस वर्षे जमा करावे लागतील.
तुम्ही या पद्धतीने गुंतवणूक करत गेल्यास पंचवीस वर्षांत तुमची एकूण 37 लाख 50 हजार रुपये यामध्ये जमा होतात. यावर जर तुम्ही 7.1% व्याजदर पकडला तर तुम्हाला 65 लाख 58 हजार पंधरा रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे तुमची एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळालेले व्याज पकडून 25 वर्षानंतर तुम्हाला एक कोटी तीन लाख आठ हजार पंधरा रुपये मिळतात.
तीस वर्षे पैसे गुंतवले तर किती रक्कम मिळेल?
पंचवीस वर्षा ऐवजी तुम्ही तीस वर्ष या योजनेत पैसे गुंतवत गेले तर तुम्हाला तीस वर्षे झाल्यानंतर एकूण तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेले व्याज असे मिळून एक कोटी 54 लाख 50 हजार 911 रुपये मिळू शकतात आणि हीच गुंतवणूक तुम्ही 35 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर तुम्हाला परिपक्वतेनंतर दोन कोटी 26 लाख 97 हजार 857 रुपये मिळतात.
या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही यामध्ये जे काही पैसे जमा करतात व त्यावर जे काही व्याज आणि परिपक्वतेनंतर जी संपूर्ण रक्कम मिळते त्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही. म्हणजेच या योजनेतील गुंतवणूक आणि मिळणारा परतावा संपूर्णपणे करमुक्त आहे.