Health Tips:- आरोग्य उत्तम असणे हे खूप महत्त्वाचे असून आरोग्य जर चांगले असेल तरच व्यक्ती दैनंदिन कामे पूर्ण करू शकतो व व्यवस्थित जीवन जगू शकतो. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देणे खूप गरजेचे असते.
सध्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारच्या असाध्य अशा आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केलेली आहे व त्यातील काही आजार तर लवकर लक्षात न आल्याने जीवघेणे देखील ठरताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे शरीराच्या छोट्या छोट्या समस्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन वेळीच वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते.

शरीरामध्ये जर एखादा आजार पसरत असेल तर त्याविषयीचे काही संकेत किंवा लक्षणे शरीराच्या बाह्य भागात आपल्याला दिसायला लागतात. यावरून आपल्याला काही आजारांचा अंदाज बांधता येतो आणि पटकन वैद्यकीय उपचार करून भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून वाचता येते.
अनेक आजारांचे लक्षण शरीराच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला दिसून येतात. परंतु आपण त्या लक्षणांकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेक समस्या उद्भवतात. याच पद्धतीने जर आपण नखांचा विचार केला तर नखामध्ये झालेला काही बदल हा त्वचेचा कॅन्सर म्हणजे त्वचेचा कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपण याविषयीची थोडक्यात माहिती बघू.
नखांवरील असे रंग असू शकते त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण
आपल्याला माहिती आहे की, हाताच्या बोटांच्या नखावर जर आपण बघितले तर एक छोटासा जो काही भाग असतो तो सफेद रंगाचा असतो. परंतु हा सफेद रंगाचा भाग असणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
परंतु बऱ्याचदा नखांवर पांढरी लाईन किंवा ठिपका पाहायला मिळतो. यावेळी आपल्याला वाटते की हे कॅल्शियम किंवा मिनरलच्या कमतरतेमुळे किंवा नखाला काही लागल्यामुळे झाले असेल. परंतु अशा प्रकारचे डाग मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर मुळे देखील होतात.
तसेच नखावर असलेली सफेद लाईन आणि ठिपका असण्याचे कारण हृदयसंबंधी विकार देखील असू शकते. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीचे निशाण नखांवर दिसत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. नखांमुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याबद्दल बरीच माहिती किंवा बरीच गोष्टी समजू शकतात.
नखांवर जर पांढरा रंगाच्या डागाच्या व्यतिरिक्त काळ्या रंगात डाग दिसत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर ही दिसणारी सर्वच लक्षणे कॅन्सरचीच असतील असे देखील सांगता येत नाही.
परंतु अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या अभ्यासानुसार बघितले तर जर नखांवर काळा डाग असेल तर ते त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा प्रकारचे डाग मेलनॉम नावाच्या त्वचेच्या कर्करोगाची असू शकतात जो घातक असा कर्करोग आहे.
नखांमधील ही हे लक्षणे देखील असू शकतात त्वचेच्या कर्करोगाची
1- नखे जर कमकुवत झाले असतील व लगेच तुटत असतील तर
2- नखा जवळ रक्तस्राव होत असेल तर
3- नखांवर हलक्या काळ्या रंगाचे डाग तसेच नखांच्या आजूबाजूचा रंग बदललेला आहे का इत्यादी गोष्टी देखील बघणे गरजेचे आहे.
4- अशा गोष्टी दिसत असतील तर निष्काळजीपणा न करता डॉक्टरांना दाखवावे. नाहीतर त्वचेचा कर्करोग वाढू शकतो.
5- नख जर काळे झाले असेल तर त्यावर नेल पॉलिश लावू नका. परंतु यामुळे घाबरून जाण्याचे देखील काही कारण नाही. या आधी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.