डाळिंबाच्या भगव्या जातील टक्कर द्यायला आली नवीन बायोफोर्टीफाईड जात! सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्राने केली विकसित

भगव्या जातीला तोडीस तोड अशी डाळिंबाची बायो फोर्टिफाइड जात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी विकसित केली असून या जातीला सोलापूर लाल असे नाव देण्यात आलेले आहे.

Published on -

Solapur Lal Pomegranate Variety:- गेल्या दशक भरापासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड केली जात असून दिवसेंदिवस फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.

फळबागांमध्ये जर आपण डाळिंब या फळ पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने नासिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंबावर तेल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढून टाकल्या.

परंतु आता पुन्हा शेतकऱ्यांनी नवीन डाळिंब बागांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून आता नुसता नाशिक जिल्हाच नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता हळूहळू डाळिंब लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

डाळिंबामध्ये प्रामुख्याने भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यानंतर आरक्ता या जातीची लागवड देखील महाराष्ट्रात होते.

परंतु आता भगव्या जातीला तोडीस तोड अशी डाळिंबाची बायो फोर्टिफाइड जात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी विकसित केली असून या जातीला सोलापूर लाल असे नाव देण्यात आलेले आहे.

काय आहेत डाळिंबाच्या सोलापूर लाल या जातीचे वैशिष्ट्ये?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोलापूर लाल ही डाळिंबाची जात बायोफॉर्टीफाईड जात आहे.

2- पोषक घटकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये लोहाचे प्रमाण 5.6 ते 6.1 मिलिग्रॅम/ प्रति 100 ग्रॅम दाने, जस्ताचे प्रमाण 0.64 ते 0.69 मिलीग्राम/ प्रति 100 ग्रॅम दाने, अँथोसायनिन ३८५ ते ३९५ मिलिग्रॅम/ प्रति 100 ग्रॅम दाने आणि जीवनसत्व क 19.4 ते 19. 8 मिलीग्राम/ प्रति 100 ग्रॅम दाने इतके आहे.तसेच ही जात गडद लाल असून यामध्ये टीसीएस 17.5 ते 17.7 डिग्री ब्रिक्स इतका आहे.

2- सोलापूर लाल जातीची फळ उत्पादकता जर बघितली तर ती हेक्टरी 23 ते 27 टनापर्यंत आहे.

3- ही जात खाण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगाकरिता उत्तम असणार आहे.तसेच सोलापूर लाल जातीच्या डाळिंबातील दाणे टपोरे आहेत.

4- साधारणपणे फुलधारणेनंतर ही डाळिंबाची प्रजात 165 दिवसांनी परिपक्व होते.

5- वेगवेगळ्या वातावरण तसेच व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती यामुळे हा कालावधी बदलू शकतो.

डाळिंबाच्या या जातीला बायोफोर्टिफाइड का म्हटले गेले आहे?
ज्या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणद्रव्य असतात तसेच प्रामुख्याने यामध्ये जीवनसत्वे, खनिजाचे प्रमाण जास्त असते व हे प्रमाण त्याच्या खाण्याच्या भागात असते त्याला बायोटिफाइड प्रजाती असे म्हणतात. कुपोषणाची कमतरता भरून काढण्याचे महत्त्वाचे काम अशा पद्धतीच्या बायोफोर्टिफाइड प्रजाती करतात.

भगवा आणि सोलापूर लाल या दोन्ही डाळिंबाच्या जातीमध्ये काय आहे फरक?

1- सोलापूर लाल ही प्रजात बायो फोर्टीफाईड प्रजाती आहे. तसेच भगवा जातीच्या डाळिंबाच्या तुलनेत ही जात गडद लाल तसेच जास्त टीएसएस, फळांचे जास्त उत्पादन तसेच लोह, जस्त, अँथोसायनिन आणि जीवनसत्व असलेली व त्याबरोबरच टपोरे दाने, प्रक्रिया उद्योगासाठी व खाण्यासाठी अत्यंत योग्य आहे.

2- सोलापूर लाल ही जात फुलधारणेनंतर 165 दिवसांनी परिपक्व होते. तर त्या तुलनेत मात्र भगवा प्रजात ही फुलधारणा झाल्यानंतर 180 दिवसांनी परिपक्व होते. म्हणजे सोलापूरला लाल ही जात भगव्याच्या तुलनेमध्ये जवळपास पंधरा दिवसांनी लवकर पक्व होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe