शरद पवार यांच्या विषयी सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर

Published on -

शिर्डी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक लिखाण करुन जनतेच्या भावना दुखावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.

लोणी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मिडीयावर एका व्यक्तीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विषयी बदनामीकारक व घृणास्पद लिखाण करुन जनतेच्या व शेतकरी बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत.

तसेच आपल्या मतावर ठाम असल्याचे नमुद करत चिथावणीखोर लिखाण केले आहे.या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप गोरक्षनाथ वर्पे,कपिल पवार, युवकचे प्रदेश सचिव निलेश कोते, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के,रा. यु. कॉ. चे तालुकाध्यक्ष संदिप सोनवणे,

विद्यार्थी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके, बापु दिघे, बबन कडु, अमोल कडु, सुधाकर कडु, अभिषेक शेळके, रामु तिवारी, विनोद मोरे, असलम शेख, सुधाकर कडु आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!