Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील बऱ्याच मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर पेच निर्माण झाला होता. तसेच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या देखील मोठी असल्याने नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी? याबाबत मोठ्या प्रमाणावर पेच निर्माण झाल्याचे आपण बघितले.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक इच्छुक नाराज झाले व त्यांनी बंडाचा झेंडा उगारत काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर काहींनी पक्ष बदल केला. या सगळ्या प्रक्रियेमुळे मात्र अधिकृत उमेदवारांपुढे मात्र मोठी समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अगदी याच पद्धतीचे चित्र आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे गेली आणि त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते व त्यामुळे राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या पार्श्वभूमीवर आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळाली असून अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांना काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे आणि नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढे पेच प्रसंग निर्माण झाला असून यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसल्याची चर्चा सध्या दिसून येत आहे.
श्रीगोंद्यात अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना पोटे दाम्पत्याचा पाठिंबा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे गेली व त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार यांच्यावर अन्याय झाला. माजी आमदार राहुल जगताप हे भविष्यामध्ये श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी सहकार्य करतील असा विश्वास असल्याने आम्ही राहुल जगताप यांना पाठिंबा देणा
असल्याची भूमिका श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पोटे यांनी जाहीर केली व गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे आणि नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी पाठिंबा जाहीर केला.
पोटे दांपत्याने घेतलेल्या या राजकीय भूमिकेमुळे महाविकास आघाडीला श्रीगोंद्यामध्ये मात्र मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आता दिसून येत आहे. यामुळे शहरातील राजकीय गणित बदलणार हे मात्र निश्चित.
या सगळ्या घडामोडी मध्ये काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर पोटे आणि नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी समर्थकांची बैठक घेत राहुल जगताप यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
इतकेच नाहीतर राहुल जगताप व मनोहर पोटे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली व यामध्ये जगताप यांना आमदारकी तर मिळेलच परंतु लाल दिवा देखील मिळावा अशा शुभेच्छा देताना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.